लॉकडाऊनमध्ये ते चालले २९०० किमी

लॉकडाऊनमध्ये ते चालले २९०० किमी

गुवाहाटी: देशव्यापी लॉकडाउन पुकारल्यानंतर गुजरातमध्ये काम करणारे ४० वर्षीय  जदाव गोगोई यांनी आसाममध्ये आपल्या घरी जाण्यासाठी सुमारे २९०० किमी अंतर कधी

कोरोनावर आयुर्वेद, होमिओपॅथी सुचवल्याने सरकारची खिल्ली
कोविड-१९ वर परिणामकारक एचसीक्यूएसचा तुटवडा
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत करोनामुळे बंदसदृश परिस्थिती

गुवाहाटी: देशव्यापी लॉकडाउन पुकारल्यानंतर गुजरातमध्ये काम करणारे ४० वर्षीय  जदाव गोगोई यांनी आसाममध्ये आपल्या घरी जाण्यासाठी सुमारे २९०० किमी अंतर कधी पायी तर कधी अन्य वाहनाची मदत घेत सुखरुप पार केले. आसामच्या हद्दीत प्रवेश करताच पोलिसांनी त्यांना अम्ब्युलन्समध्ये बसवून त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. अतिश्रम व थकव्यामुळे गोगोई यांची प्रकृती अशक्त झाली असली तरी त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे नागाव सिविल रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

गोगोई यांनी गुजरातमधून नेमक्या कुठल्या ठिकाणाहून प्रवास केला याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. पण ते गुजरातमध्ये काम करत होते आणि आसाममधील नागाव जिल्ह्यातल्या पुरानीगुडाम गावांत राहात होते, अशी माहिती मिळाली आहे.

गुजरातमधून २७ मार्चला गोगोई यांनी आपले काही सामान बरोबर घेतले आणि ते मध्य प्रदेश, बिहार, प. बंगाल अशी राज्ये पार करत २० एप्रिल रोजी आसाममधील नागांव जिल्ह्यात दाखल झाले. जदाव गोगोई यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून या व्हिडिओत गोगोई यांनी बिहारमध्ये ट्रकमधून काही किमी प्रवास केल्याचे म्हटले आहे. पण नंतर वाहने मिळत नसल्याने त्यांनी आसामपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर गुजरातमध्ये एका फॅक्टरीत काम करणारे गोगोई यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या खिशात केवळ ४ हजार रु.ची रक्कम होती. पण ही रक्कम व त्यांचा मोबाईल मधल्या प्रवासात चोरांकडून पळवण्यात आला.

बिहारमध्ये पोहचल्यानंतर त्यांनी एका व्यक्तीच्या फोनमधून आसाममधील आपल्या घराशी संपर्क साधला व आपण मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी चालत घरी येत असल्याचे सांगितले. या नंतरच्या अनेक दिवसाच्या प्रवासात गोगोई यांचा घराशी संपर्क होत नव्हता, त्यामुळे त्यांच्या घरातील नातेवाईकांना चिंता वाटू लागली. पण १३ एप्रिलला आसाममधील बारपेटा जिल्ह्यात शिरल्यानंतर त्यांचा मेव्हण्याशी संपर्क झाला, त्यात त्यांनी आपण लवकरच घरी येत असल्याचे कुटुंबियांना कळवले.

लॉकडाऊनच्या काळात सुमारे २९०० किमी अंतर चालत व वाहनांच्या मदतीने पार करण्याचा गोगोई यांचा प्रयत्न अविश्वसनीय व थक्क करणारा आहे. पण असे हजारो स्थलांतरित आजही आपल्या घरी जाण्यासाठी धडपडत आहेत. शिवाय अनेक स्थलांतरितांचा दमछाक करणार्या प्रवासाने मृत्यूही झाला आहे.

दरम्यान, आसाममध्ये राहणारे सुमारे ४५ हजार स्थलांतरित देशातील विविध राज्यात अडकले असल्याची माहिती आसाम प्रशासनाने दिली असून सोमवारी ८६ हजार खात्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रु.ची रक्कम आसाम सरकारने जमा केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: