लॉकडाऊनमध्ये श्रमिकांना पगार देण्याचा आदेश गृहखात्याकडून मागे

लॉकडाऊनमध्ये श्रमिकांना पगार देण्याचा आदेश गृहखात्याकडून मागे

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांना पगार द्यावा हा आपणच दिलेला आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने मागे घेतला आहे. २९ मार्चला गृहखात्याने लॉकडाऊनच्या क

प्रशांत भूषण यांना न्यायालयाच्या बेअदबीप्रकरणी नोटीस
जगात कोरोनाचे ६ कोटीहून अधिक रुग्ण
२३ व्या दिवशीही काश्मीरमधील जनजीवन विस्कळीतच

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांना पगार द्यावा हा आपणच दिलेला आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने मागे घेतला आहे. २९ मार्चला गृहखात्याने लॉकडाऊनच्या काळात सर्व खासगी उद्योजक, आस्थापने, कारखानदार, दुकानदार, व्यावसायिकांनी श्रमिकांना पगार द्यावा, असे आदेश काढले होते आणि १७ मे रोजी पुकारलेल्या ४ थ्या लॉकडाऊनमध्येही हे आदेश देण्यात आले होते. पण आता हे आदेश १८ मे पासून मागे घेण्यात आल्याचे केंद्रीय गृहखात्याने म्हटले आहे.

पहिला लॉकडाऊन पुकारल्यानंतर गृहखात्याने कंपनी व खासगी उद्योग बंद असले तरी सर्व श्रमिकांना त्यांचा पगार, वेतन कोणतीही कपात न करता देण्याचे आदेश दिले होते व तसे न केल्यास दंडाचीही भीती दाखवण्यात आली होती. या आदेशात घरमालकांनी विद्यार्थी व अन्य कुटुंबांकडून घरभाडे घेऊ नये असेही स्पष्टपणे नमूद केले होते.

४ थ्या लॉकडाऊनमध्ये सहा नवे निर्देश होते ज्यात मजुरांच्या स्थलांतरणाबाबत अधिक भर होता. पण या निर्देशांत श्रमिकांच्या पगाराबाबत काहीच उल्लेख नाही.

गेल्या २९ मार्चलाच गृहखात्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानुसार गेल्या शुक्रवारी दोन याचिकांवर आपला हंगामी आदेश देताना न्यायालयाने २९ मार्चच्या निर्देशांचे पालन न करणार्या उद्योगांविरोधात कारवाई करू नये असे आदेश दिले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: