लॉकडाऊन शेवटचा पर्याय – मोदी

लॉकडाऊन शेवटचा पर्याय – मोदी

आमचा सगळ्यांचा प्रयत्न जीव वाचवणे हाच आहे. नागरिकांनी गरज नसेल, तर घराबाहेर पडू नये. राज्यांनी लॉकडाऊन शेवटचा पर्याय म्हणून वापरावा आणि सर्वांनी एकत्र

जॉर्ज ऑरवेलच्या श्रेष्ठत्वाचा मर्मभेद
दुसऱ्या लाटेने ‘कोवॅक्स’चा पुरवठा मंदावला
विधानसभेच्या अध्यक्षपदी नार्वेकर

आमचा सगळ्यांचा प्रयत्न जीव वाचवणे हाच आहे. नागरिकांनी गरज नसेल, तर घराबाहेर पडू नये. राज्यांनी लॉकडाऊन शेवटचा पर्याय म्हणून वापरावा आणि सर्वांनी एकत्रीत येऊन काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्यांनी राष्ट्राशी संवाद साधला. मोदी म्हणाले.

  • सर्व देश कोरोनाशी लढत आहे.
  • अनेकजणांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत. मी तुमच्या दुखःत सहभागी आहे.
  • डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी अॅंब्यूलन्स चालक यांनी खूप काम केले आहे, त्यांना धन्यवाद.
  • कठीण काळातही धैर्य घालवू नये.
  • ऑक्सीजनची मागणी वाढली आहे. त्यासाठी सर्वजण काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारे काम करीत आहेत. लवकरच १ लाख ऑक्सीजन सिलेंडर्स उपलब्ध होतील.
  • देशातील फार्मा सेक्टर वेगाने काम करीत आहे.
  • बेड वाढविण्याचे काम देशभरात सुरू आहे.
  • आमच्या शास्त्रज्ञांनी प्रचंड काम करून लस विकसित केली. जगातील सर्वात स्वस्त लस भारतात उपलब्ध झाली आहे.
  • १२ कोटी असे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
  • लस क्षेत्रामध्ये वेगाने परवानगी देण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
  • आमचा सगळ्यांचा प्रयत्न जीव वाचवणे हाच आहे.
  • १८ वर्षं आणि त्यापुढील सर्वांसाठी लस उपलब्ध होईल. हा भारताचा वर्क फोर्स आहे. तो कार्यरत राहणे गरजेचे आहे. आर्थिक चक्र सुरू राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
  • कामगार आणि मजदूर यांनी आहे त्याच ठिकाणी थांबावे. त्यासाठी राज्य सरकारांनी त्यांना विश्वास द्यावा.
  • आज आपल्याकडे पी पी ई किट, टेस्टिंग सुविधा, लस अशा सुविधा आहेत. गेल्यावर्षीपेक्षा ही स्थिती खूप चांगली आहे.
  • सगळे एकत्रीतपणे काम करीत आहेत. संघटना काम करीत आहेत. ज्यांना गरज आहे, त्यांना मदत करण्यासाठी पुढे या.
  • युवकांनी पुढे येऊन कोविड पसरू नये, यासाठी शिस्त पालन करण्यासाठी पुढे येऊन समित्या तयार कराव्यात. ज्यामुळे बंधने आणि लॉकडाऊन लावण्याचा प्रश्न येणार नाही.
  • लहान मुलांनी गेल्यावर्षीप्रमाणे घरातील मोठ्यांवर लक्ष ठेवावे.
  • माध्यमांनी पुढे येऊन मदत करावी. माध्यमांनी अफवा पसरवू नये, यासाठी पुढाकार घ्यावा.
  • राज्यांनी लॉकडाऊन हा अंतीम पर्याय म्हणून वापरावा. मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष द्यावे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: