रेल्वेकडून प्रवासी सेवा सुरू

रेल्वेकडून प्रवासी सेवा सुरू

नवी दिल्ली/मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे गेले २ महिने रेल्वेसेवा बंद आहे. ती मंगळवारपासून अंशत: सुरू कर

रंग रंग रंगीला रे…
सर्वोच्च न्यायालयाची ‘देशद्रोह’ कायद्याला स्थगिती
दावा म्हणजे औषध नव्हे!

नवी दिल्ली/मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे गेले २ महिने रेल्वेसेवा बंद आहे. ती मंगळवारपासून अंशत: सुरू करण्यात आली. पहिली रेल्वे दिल्ली ते विलासपूर अशी सुरू झाली.

दरम्यान, या रेल्वेतून विविध राज्यात अडकलेले पर्यटक, प्रवासी यांना त्यांच्या राज्यांत, शहरांत, गावांत पोहचवले जाणार आहे. पण या रेल्वेतून प्रवास करणार्या सर्वांना आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे सक्तीचे केले आहे.

ज्या विशेष गाड्या रेल्वे सोडणार आहेत त्यांची सुमारे ४५ हजारहून अधिक तिकीटे विकली गेली असून त्यातून ८० हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करणार आहेत. रेल्वेला या तिकीट विक्रीतून सुमारे १६ कोटी १५ लाख रु. मिळणार आहेत. रेल्वेने आपल्या प्रवाशांना त्यांचे जेवण व चादर आणण्यास सांगितले आहे. प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी अनिर्वाय असल्याने रेल्वे स्थानकावर ९० मिनिटे प्रत्येकाने उपस्थित राहण्यासही सांगण्यात आले आहे.

या रेल्वे नवी दिल्ली व देशातील मुख्य शहरे दिब्रूगड, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद व जम्मू तावी दरम्यान धावणार आहेत.

मंगळवारी धावलेल्या आठ गाड्यांपैकी तीन गाड्या नवी दिल्लीपासून दिब्रुगड, बंगळुरू, बिलासपूरला जातील, तर हावडा, राजेंद्र नगर, बंगळुरू, मुंबई सेंट्रल व अहमदाबादहून प्रत्येकी एक गाडी नवी दिल्लीला पोहचेल.

लॉकडाऊन असल्याने या विशेष रेल्वेंमध्ये फक्त वातानुकूलित डबेच (एसी-१, एसी-२, एसी-३) असतील व यांचे भाडे राजधानी एक्स्प्रेस एवढे असेल. या रेल्वेत आरएसी व वेटिंग तिकीट नसणार आहे तसेच प्रवासादरम्यान कुणालाही तिकीट तपासनीसकडून तिकीट काढता येणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

ज्यांचे तिकीट कन्फर्म असेल त्यांनाच प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी असून डब्यात बसण्याअगोदर प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, त्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने मास्क लावणे आवश्यक आहे. पूर्ण प्रवासात प्रवाशांनी शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे व आपल्या शहरांत पोहोचल्यानंतर त्या त्या राज्यांच्या आरोग्य नियमानुसार प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे.

आजपर्यंत ६ लाख श्रमिक आपल्या राज्यात पोहचले

दरम्यान, ५४२ श्रमिक ट्रेनमधून सुमारे ६ लाख श्रमिक आपल्या राज्यात पोहचल्याचे रेल्वेने सांगितले. या श्रमिक ट्रेनमधून १२०० प्रवाशांपैकी १७०० प्रवासी पाठवण्यात आले.

हे प्रवासी तिरुचिरापल्ली, टिटलागढ़, बरौनी, खंडवा, जगन्नाथपूर, खुर्दा रोड, प्रयागराज, छपरा, बलिया, गया, पूर्णिया, वाराणसी, दरभंगा, गोरखपूर, लखनऊ, जौनपूर, हटिया, बस्ती, कटिहार, दानापूर, मुजफ्फरपूर, सहरसा येथे पोहचले.

आता रेल्वेकडून रोज १०० ट्रेन धावणार आहेत.

रेल्वेने श्रमिक आपल्या घरात सुखरूप पोहचतील यासाठी त्यांना रेल्वेत मोफत भोजन व पाण्याची सोय केली होती. प्रत्येक श्रमिकाची आरोग्य चाचणी करून त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0