लॉकडाऊनमध्ये वायरच्या संपादकांना नोटीस

लॉकडाऊनमध्ये वायरच्या संपादकांना नोटीस

नवी दिल्ली – संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये बंद असताना, उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र ‘द वायर’च्या संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांना मंगळवारी १४ एप्रिल

बोरिस जॉन्सन यांच्या विजयाचा अर्थ काय?
तेलतुंबडेंच्या बचावासाठी उभे राहणे अत्यावश्यक का आहे?
भाजपचा डाव फसला, पवारांपुढे ईडी नरमले

नवी दिल्ली – संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये बंद असताना, उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र ‘द वायर’च्या संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांना मंगळवारी १४ एप्रिलला सकाळी १० वाजता आयोध्या पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती मात्र आता अचानक मेलवरून उत्तर पाठविण्यास सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी पोलिसांच्या एका गटाने संपादकांच्या दिल्लीतील निवासस्थानी येऊन नोटीस बजावली. देशभरात लॉकडाऊन असताना आणि हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असतानाही, पोलिसांनी आयोध्या ते दिल्ली असा ७०० किलोमीटरचा प्रवास रस्त्याने करून, नोटीस बजावण्याचे काम केले होते. मात्र १२ एप्रिलला तपास अधिकाऱ्याने फोन करून लॉकडाऊनचे कारण देऊन मेलद्वारे नोटीसीला उत्तर पाठविण्यास वरदराजन यांना सांगितले.

सिद्धार्थ वरदराजन यांचे उत्तर

सिद्धार्थ वरदराजन यांचे उत्तर

भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४१ (ए) नुसार फैजाबाद पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वरदराजन यांनी मेल करून उत्तर पाठविले आहे. त्यामध्ये म्हंटले आहे, “राष्ट्रव्यापी लॉकडाऊन असल्याने आणि प्रवास करण्यास बंदी असल्याने, पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालय आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांनी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे आरोपी आपला जबाब स्पीड पोस्ट आठवा मेलने पाठवू शकतो. तसा मी पाठवीत आहे.

मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी ट्वीट करून २४६/२० या कलमांचा उल्लेख केला आहे, जो तुमच्या ४१ (ए) च्या नोटीसीमध्ये या कलमांचा उल्लेख नाही. मला तक्रारीची प्रत पाठविलेली नाही.

माझ्यावर जनसेवकाचा अपमान, लोकांमध्ये खळबळ निर्माण करणे, द्वेष भावना निर्माण करणे, संगणकाचा उपयोग करून आक्षेपार्ह साहित्य निर्माण करणे, असे आरोप ठेवण्यात आल्याचे तुमचे म्हणणे आहे.

माझ्या वरील विनंतीला आपले उत्तर आल्यानंतर मी सविस्तर उत्तर पाठवेन.”

‘द वायर’च्या संपादकांविरुद्ध दोन खाजगी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. वरदराजन यांच्या उल्लेख नसलेल्या एका ट्वीटचा संदर्भ देऊन एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसऱ्या तक्रारीमध्ये म्हंटले आहे, की ‘द वायर;च्या संपादकांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लोकांमध्ये अफवा पसरविण्याचे काम केले आहे.

“ज्या दिवशी तब्लीघी जमातची घटना घडली, त्याच दिवशी योगी आदित्यनाथ यांनी आयोध्येमध्ये रामनवमीचा मोठा समारंभ घेण्याचे नियोजन केले. आचार्य परमहंस म्हणाले, की राम भक्तांना कोरोना विषाणूपासून वाचवेल. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लॉकडाऊनची २४ तारखेला घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदित्यनाथ यांनी लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करून डझनभर लोकांसह आयोध्येमध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.” असे ब्लॉगमध्ये लिहिल्याचे तक्रारीमध्ये म्हंटले आहे.

तक्रारीमध्ये जो मजकूर लिहिण्यात आला होता, ती वस्तुस्थिती असून, सगळीकडे छापून आली आहे. तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि आदित्यनाथ यांच्या माध्यम सल्लागाराने ती ट्वीट करून सगळीकडे लगेच पसरविली होती.

‘द वायर’मध्ये ३१ मार्चला आलेल्या बातमीचा संदर्भ देऊन तक्रार करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये तब्लीघी जमातच्या घटनेचा संदर्भ होता. तसेच त्याचवेळी नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आणि सगळ्याच धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावल्याचा संदर्भ होता.

वरदराजन यांची पत्नी आणि दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्राच्या प्राध्यापक असणाऱ्या नंदिनी सुंदर यांनी ट्वीट करून पोलीस त्यांच्या घरी आल्याची माहिती दिली होती. १० एप्रिलला सध्या कपड्यातील पोलिसांनी प्रथम येऊन आणि नंतर गणवेशातील पोलिसांनी येऊन नोटीस दिल्याची माहिती सुंदर यांनी दिली. काळ्या रंगाच्या एसयुव्हीमधून आलेल्या त्यातल्या दोघांनी मास्क घातले नव्हते. त्यातल्या एकाचे नाव चंद्रभान यादव असे होते.त्यांनी सुंदर यांना नोटीस देण्यास नकार दिला. स्त्रिया आणि लहान मुलांना नोटीस देण्याचा आमचा नियम नाही असे त्यांनी सांगितले मात्र नंतर नियम दाखवा म्हंटल्यावर नोटीस देण्यात आली.

३ एप्रिल रोजी एडिटर्स गिल्डने या तक्रार दाखल करण्याच्या क्र्तीचा निषेध केला असून, ही धमकी असल्याचे म्हंटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: