बहुमत सिद्ध करण्याअगोदर कमलनाथ सरकारचा राजीनामा

बहुमत सिद्ध करण्याअगोदर कमलनाथ सरकारचा राजीनामा

भोपाळ : काँग्रेसच्या १६ बंडखोर आमदारांना स्वपक्षात आणण्यात म. प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना अपयश आल्याने त्यांच्या सरकारने बहुमत सिद्ध करण्याऐवजी

बंगालमध्ये तृणमूल, पण ममतादीदींचा पराभव
सर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता
अर्णबवरील फिर्याद रद्द करण्यास नकार

भोपाळ : काँग्रेसच्या १६ बंडखोर आमदारांना स्वपक्षात आणण्यात म. प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना अपयश आल्याने त्यांच्या सरकारने बहुमत सिद्ध करण्याऐवजी शुक्रवारी राजीनामा दिला. आपल्या सरकारच्या १५ महिन्याच्या कामगिरीचा दाखला देत कमलनाथ यांनी आज नंतर उद्या येतो व उद्या नंतर परवाही येतो असे विरोधकांना उद्देशून सूचक विधान करत राज्यपालांकडे आपण राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

१० मार्चला काँग्रेसचे एक बडे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या गटातील २२ आमदारांनी राजीनामा दिला. त्यामुळे कमलनाथ सरकारचे बहुमत संकटात आले होते. म. प्रदेशच्या विधानसभेत बहुमताला ११६ आमदार संख्या आवश्यक आहेत पण काँग्रेसचे संख्याबळ ९२ वर घसरल्यानंतर कमलनाथ बंडखोर आमदारांचे कसे मन वळवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. भाजपने या सर्व बंडखोर आमदारांनी बंगळुरूत नेल्यामुळे तर आमदारांचा घोडेबाजार झाल्याचे स्पष्टच झाले होते. त्यात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करून दाखवावे असा आदेश दिल्यानंतर कमलनाथ यांच्यापुढचे सरकार वाचवण्याचे पर्याय शिल्लक राहिले नाहीत. अखेर त्यांनी अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यापेक्षा राजीनामा देणे पसंत केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: