महिला उमेदवारावर टिप्पणीने कमल नाथ अडचणीत

महिला उमेदवारावर टिप्पणीने कमल नाथ अडचणीत

नवी दिल्ली: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते कमल नाथ यांनी डाबरा पोटनिवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्त्री उमेदवाराचा उल्

गजब गोवा, उडता पंजाब आणि अस्वस्थ उत्तर प्रदेश
‘फेसबुक’चा फसवा चेहरा
कोणाचा ‘फटका’ कोणाला?

नवी दिल्ली: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते कमल नाथ यांनी डाबरा पोटनिवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्त्री उमेदवाराचा उल्लेख ‘आयटम’ असा केल्यामुळे राजकारण आणि समाजात होणाऱ्या स्त्रियांच्या निरादराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राज्यात ३ नोव्हेंबर रोजी विधानसभा पोटनिवडणुका होणार आहेत. डाबरा येथील काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे ‘साधा माणूस’ आहे, त्यांच्या विरोधात लढणाऱ्या ‘आयटम’सारखे ते नाहीत, असे उद्गार सुशिक्षित नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमल नाथ यांनी काढले. हा शब्द वापरण्यापूर्वीही कमल नाथ भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचे नावही न घेता त्यांच्याबद्दल तुच्छतेने बोलत होते. यावर जमलेल्या गर्दीतील लोक भाजप उमेदवाराचे नाव घेऊ लागल्यानंतर ‘तुम्ही त्यांना माझ्याहून चांगले ओळखता, तुम्ही मला पूर्वीच इशारा द्यायला हवा होता त्या काय आयटम आहेत याचा,’ असे नाथ म्हणाले. नंतर ‘आपण सगळेच आयटम्स आहोत’ असंही कमल नाथ म्हणाले असे काही बातम्यांत म्हटले आहे. मात्र, ‘द वायर’ याबद्दल विश्वासार्ग स्रोताकडून पुष्टी मिळवू शकलेले नाही.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि सर्वोच्च न्यायालयात याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यावर कडक टीकास्त्र सोडले आहे. इमरती देवी या खेड्यात मजुरी करणारी एक स्त्री जनतेची सेवा करत आहे. त्या एका शेतकऱ्याच्या कन्या आहेत, असा शब्दांत त्यांनी इमरती देवींचे कौतुक केले.

“त्यांचा उल्लेख ‘आयटम’ असा करून काँग्रेसने व त्यांच्या नेतृत्वाने आपली सरंजामशाही मानसिकता दाखवून दिली आहे,” असे चौहान म्हणाले. नाथ यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री चौहान, भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंदिया, केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि पक्षातील अन्य नेत्यांनी सोमवारी दोन तास मौन पाळले. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही पत्र पाठवले आहे.

सिंदिया यांचे निष्ठावंत समजले जाणाऱ्या इमरती देवी आणि २१ अन्य आमदारांनी गेल्या मार्चमध्ये काँग्रेसमधून राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे कमल नाथ यांचे सरकार पडले.

मध्यप्रदेश विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणुका ३ नोव्हेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत आणि मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: