न्या. विजया ताहिलरामाणी यांचा राजीनामा

न्या. विजया ताहिलरामाणी यांचा राजीनामा

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश विजया के. ताहिलरामाणी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजिअमने त्यांची मेघालय उच्च न्यायालयात बद

डॉ. कफील खान : फौजदारी कारवाई हायकोर्टाकडून रद्द
रथीन रॉय, शमिका रवी यांच्या जागी दोन नवे सदस्य
कोरोनाचे संकट पण अयोध्येत राम नवमी धुमधडाक्यात होणार

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश विजया के. ताहिलरामाणी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजिअमने त्यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली केल्याच्या निर्णयाचा फेरविचार न केल्याने शुक्रवारी राजीनामा दिला. न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला असून त्याची एक प्रत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनाही पाठवली आहे

२८ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने न्या. ताहिलरामाणी यांची बदली मेघालय उच्च न्यायालयात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा म्हणून न्या. ताहिलरमानी यांनी कॉलेजियमला विनंती केली होती. त्यांनी कॉलिजियमच्या बदली प्रस्तावालाही विरोध केला होता. पण त्यांची विनंती कॉलिजियमने नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिला. न्या. ताहिलरामानी २ ऑक्टोबर २०२० रोजी निवृत्त होणार होत्या.

न्या. ताहिलरामाणी यांच्या राजीनाम्यानंतर देशातल्या उच्च न्यायालयात फक्त आता एकच महिला मुख्य न्यायाधीश म्हणून उरल्या आहेत. सध्या जम्मू व काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी गीता मित्तल आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये न्या. ताहिलरामाणी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती.

न्या. ताहिलरामाणी यांच्या कारकीर्दीची सुरवात महाराष्ट्र राज्याचे वकील म्हणून झाली होती. नंतर २६ जून २००१मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बढती मिळाली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीशपदही त्यांनी सांभाळले होते. या काळात त्यांनी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात सर्व ११ आरोपींना दोषी ठरवून त्यांना जन्मठेप सुनावली होती. न्या. ताहिलरामाणी यांनी महिला कैंद्यांना गर्भपात करण्याचा अधिकार आहे, असा ऐतिहासिक निकालही दिला होता.

कॉलेजियमशी मतभेद झाल्यानंतर राजीनामा देणाऱ्या न्या. ताहिलरामाणी या दुसऱ्या न्यायाधीश आहेत. २०१७मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जयंत पटेल यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली झाली होती. त्यावेळी न्या. पटेल यांनी कोणतेही कारण न देता राजीनामा दिला होता. न्या. पटेल यांनी गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले होते आणि त्यांनी इशरत जहाँ कथित चकमक प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: