महंत नृत्यगोपाल दास कोरोनाबाधित

महंत नृत्यगोपाल दास कोरोनाबाधित

नवी दिल्ली: अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान व्यासपीठावर उपस्थित मोजक्या पाच व्यक्तींपैकी एक असलेल्या महंत नृत्यगोपाल दास यांना कोविड-१९

अयोध्या: सरकार व न्यायसंस्थेला जमले नाही ते भारतातील मुस्लिमांनी करून दाखवले
राम मंदिराची उंची१६१ फूटपर्यंत वाढवली
प्रजासत्ताक दिनाला अयोध्येत मशिदीचे काम सुरू

नवी दिल्ली: अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान व्यासपीठावर उपस्थित मोजक्या पाच व्यक्तींपैकी एक असलेल्या महंत नृत्यगोपाल दास यांना कोविड-१९ची लागण झाली आहे. दास यांची कोविड चाचणी पॉझिटिव आली आहे.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष दास हे भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत व्यासपीठावर होते.

दास यांना कोरोनाविषाणूची लागण नेमकी केव्हा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरीही एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केलेल्या फोटोमध्ये दास हे पंतप्रधान मोदी व योगी आदित्यनाथ यांच्या मध्ये मास्कही न घालता उभे दिसत आहेत. या सोहळ्यादरम्यान ते पंतप्रधानांच्या बरेच जवळ होते हे दाखवणारी अनेक दृश्ये आहेत.

आदित्यनाथ यांनी महंत दास यांच्या आरोग्याची चौकशी केली असून, त्यांना गुडगाव येथील मेदानता रुग्णालयात हलवले जाणार आहे. दास यांना ताप नाही पण त्यांना धाप लागत आहे, असे मथुरेचे जिल्हाधिकारी राम मिश्रा यांनी सांगितले.

हा सोहळा ज्यांच्या हस्ते होणार होते त्या पुरोहितांना तसेच या स्थळावर देखरेख ठेवणाऱ्या १६ पोलिसांना सोहळ्यापूर्वीच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान आले होते. यामुळे हा सोहळा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती.

भूमिपूजनाच्या तीन दिवस आधी कोरोनाची चाचणी पॉझिटिव आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मेंदांता रुग्णालयातच उपचार घेत आहेत. तेथेच दास यांनाही दाखल केले जाणार आहे.

दास स्वत:ला रामाच्या अयोध्यातील सर्व बाबींचे नैसर्गिक राखणकर्ते’ समजतात अशा आशयाचा लेख शरत प्रधान यांनी मार्चमध्ये द वायर’साठी लिहिला होता. त्यांनी लिहिले होते-

रामजन्मभूमी अभियानातील ठळक चेहरा या पूर्वीच्या भूमिकेतून किंवा सध्याच्या अधिकृत क्षमतेतून, रामजन्मभूमीशी निगडित प्रत्येक गोष्टीचे तसेच प्रस्तावित राममंदिराचे आपण नैसर्गिक राखणदार आहोत असे नृत्यगोपाल दास समजतात.

ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड होण्यापूर्वी दास रामजन्मभूमीन्यासाचे प्रमुख होते. हा न्यास म्हणजे अयोध्येतील वादग्रस्त स्थळी मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा लावून धरणारा विश्व हिंदू परिषदेचा ट्रस्ट आहे. बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणाप्रकरणी सीबीआयने त्यांच्यावर आरोप ठेवले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवरून केंद्र सरकारने फेब्रुवारीत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली पण अध्यक्ष व महासचिवांची पदे रिक्त ठेवली. या स्वायत्त संस्थेला दास आणि विहिंप नेते चंपत राय यांची या पदांवर अनुक्रमे निवड करणे शक्य व्हावे म्हणून सरकारने पदे रिक्त ठेवली होती.

बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरण प्रकरणात आरोप असलेल्या दास किंवा राय यांना सरकारने त्यावेळी या पदांवर निवडले असते तर वाद निर्माण झाला असता.

काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले असते. त्यामुळे ट्रस्टची स्थापना करण्याच्या कामाला २-३ महिने विलंब झाला असता. त्यामुळे ते टाळण्यात आले,” असे गुप्ता म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: