सगळ्या एक्झिट पोलमध्ये युतीला आघाडी 

सगळ्या एक्झिट पोलमध्ये युतीला आघाडी 

मुंबई : राज्यात सोमवारी २८८ विधानसभा जागांसाठी झालेले सरासरी मतदान केवळ ५६.६५ टक्के झाले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी असून

आरोपामुळे वानखेडेंचीच एनसीबीकडून चौकशी
जामियातील दडपशाही : लखनौ, हैदराबाद, मुंबईतील विद्यार्थी रस्त्यावर
‘अर्जुनाच्या बाणात अण्वस्त्रे, तर रामायणात पुष्पक विमान’

मुंबई : राज्यात सोमवारी २८८ विधानसभा जागांसाठी झालेले सरासरी मतदान केवळ ५६.६५ टक्के झाले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी असून काही ठिकाणी पडलेला पाऊस व राजकारणाविषयीची असलेली अनास्था, नेत्यांच्या कारभाराविषयी असलेला संताप व विरोधी पक्षांमधील नसलेली एकजुट यामुळे मतदानाची टक्केवारी घसरलेली दिसते.

पण मतदानाची टक्केवारी घसरलेली असताना विविध संस्थांच्या एक्झिट पोलनी राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचे राज्य येईल असे अंदाज वर्तवले आहेत.

टाइम्स नाऊ : महायुती -२३०, आघाडी -४८, इतर -१०

सीएनएन न्यूज-१८ : महायुती-२४३, आघाडी-४१, इतर ४.

इंडिया टुडे-माय अक्सिस : महायुती – १६६, आघाडी-८८, इतर-३४

एबीपी-सीव्होटर : महायुती-२०४, आघाडी-७५, इतर १५

जन की बात : महायुती – २२३, आघाडी -५४, इतर -११.

टीव्ही-९ मराठी : महायुती – १९७, आघाडी – ८५, इतर १६.

असे एक्झिट पोलचे अंदाज असून या सर्व पोलची सरासरी काढली असता महायुतीला २१३, आघाडीला ६१ व इतरांना १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राज ठाकरे यांचा पक्ष मनसेला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज आहे.

या एक्झिट पोलनुसार मराठवाडा व मुंबईमध्ये महायुतीने अनपेक्षित अशी आघाडी घेतलेली दिसते. मराठवाड्यात ४६ जागांपैकी ३६ तर मुंबईतल्या ३६ जागांपैकी ३३ जागा महायुतीच्या पारड्यात पडतील असा अंदाज या एक्झिट पोलचा आहे. विदर्भात, प. महाराष्ट्र, ठाण्यासह कोकण येथेही  युतीला पुन्हा जनतेचा पाठिंबा मिळाल्याचा अंदाज आहे.

एक्झिट पोलनुसार हरियाणातही भाजपकडेच सत्ता

हरियाणात ९० पैकी ७५ विधानसभा जागा जिंकण्याचे ‘मिशन’ भाजपचे होते. तेथे ही किमया भाजप सहज साधेल असे सर्व एक्झिट पोलचे अंदाज आहेत.

एबीपी-सी व्होटर : भाजप – ७२ , काँग्रेस – ८ जागा

सीएनएन-आयपीएसओएस : भाजप – ७५ ,काँग्रेस – १०

जन की बात : भाजप -५७, काँग्रेस १७, इतर १६

टीव्ही९ भारतवर्ष : भाजप -४७, काँग्रेस- ११, इतर -२

न्यूज एक्स : भाजप – ४७, काँग्रेस -२३

इंडिया न्यूज : भाजप -७५, काँग्रेस -९

टाइम्स नाऊ : भाजप – ७१, काँग्रेस -११

एकूण सरासरी : भाजप – ६६, काँग्रेस -१४, आरएनएलडी -२

असे हे अंदाज असून, भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: