एक्झिट पोल ठरले फोल!

एक्झिट पोल ठरले फोल!

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-सेना युतीला सत्ता मिळेल, असे सगळ्या एक्झिट पोलने अंदाज व्यक्त केले होते. त्यानुसार महायुती सत्तेकडे वाटचाल करीत आहे. मात्र एक्झिट पोल करणाऱ्या सर्वच संस्थांनी दिलेले आकडे चुकीचे ठरले आहेत.

‘राज्य निवडणूक आयोगाचे काम भाजपच्या आयटी सेलकडे’
प्रचारकी ‘नमो टीव्ही’
आकड्या पलिकडचा विजय !

६ वेगवेगळ्या संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये महायुतीला १८० ते २३० जागा मिळतील असे भाकीत वर्तवले होते. तसेच महाआघाडीला ४१ ते ७५ जागा मिळतील आणि इतर पक्षांना मिळून ४ ते ३४ जागा मिळतील, असे जाहीर करण्यात आले होते. याच आकड्यांचा आधार घेत भाजपचे नेतेही महाघाडीला २२० ते २५० जागा मिळतील, असे छातीठोकपणे सांगत होते. मतमोजणी सुरु झाल्यावरही हाच दावा करण्यात येत होता. गुरुवारी दुपारी १२ वाजेनंतर चित्र स्पष्ट झाले आणि एक्झिट पोलही खोटे ठरल्याचे स्पष्ट झाले.

२८८ विधानसभा जागांसाठी झालेले सरासरी मतदान केवळ ५६.६५ टक्के झाले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. काही ठिकाणी पडलेला पाऊस व राजकारणाविषयीची असलेली अनास्था, नेत्यांच्या कारभाराविषयी असलेला संताप व विरोधी पक्षांमधील नसलेली एकजुट यामुळे मतदानाची टक्केवारी घसरलेली दिसली. मतदानाची टक्केवारी घसरलेली असताना विविध संस्थांच्या एक्झिट पोलनी राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचे राज्य येईल असे अंदाज वर्तवले होते. त्यामुळे भाजप समर्थकांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र निकालांनी त्यांची निराशा केली.

एक्झिट पोलचे एकूण अंदाज पाहता सर्व पोलची सरासरी काढली असता महायुतीला २१३, आघाडीला ६१ व इतरांना १४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. राज ठाकरे यांचा पक्ष मनसेला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज बांधण्यात आला होता.

मात्र महाराष्ट्रामध्ये हे सगळेच पोल खोटे ठरल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात ‘इंडिया टुडे – माय अक्सिस’चे आकडे बऱ्यापैकी जवळ जाणारे ठरले. त्यांनी महायुतीला कमीत कमी १६६ जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले होते. तर महाआघाडीला ७२ जागा आणि इतरांना २२ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.

प्रत्यक्षात युतीला १६२ जागा आणि महाआघाडीला १०४ जागा मिळाल्या आहेत आणि इतर पक्षांना मिळून २२ जागा मिळाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाला एक जागाही मिळाली. भाजपच्या अनेक मंत्र्यांची आणि नेत्यांची धूळधाण झाली. ते या आकड्यांमध्ये आले नव्हते.

एक्झिट पोलचे आकडे

क्र. संस्था महायुती आघाडी इतर
टाइम्स नाऊ २३० ४८ १०
सीएनएन न्यूज-१८ २४३ ४१
इंडिया टुडे – माय अॅक्सिस १६६ – १९४ ७२ – ९० २२ – ३४
एबीपी- सी व्होटर २०४ ७५ १५
जन की बात- रिपब्लिक २१६ – २३० ५० – ६९ ८ – १२
टीव्ही-९ सिसेरो १९७ ७५ १६
प्रत्यक्षातील आकडे १६२ १०४ २२

या पूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचा अनुभव असणारे ज्येष्ठ पत्रकार-संपादक निखिल वागळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “आम्ही ‘आयबीएन-लोकमत’ला

निखिल वागळे

निखिल वागळे

‘आयएसडीएस’चे एक्झिट पोल अनेक निवडणुकांमध्ये दाखविले आहेत. ८० ते ९० टक्के वेळा ते बरोबर आले आहेत. मुळात आपण एक्झिट पोल म्हणजे नेमके काय हे समजून घेतले पाहिजे. एक्झिट पोल कोणती संस्था करीत आहे, यावर त्या एक्झिट पोलची विश्वासार्हता ठरते. एक्झिट पोलचा नमुना आकार (sample size) म्हणजे किती लोकांची प्रातिनिधिक मते घेण्यात आली आहेत, यावर त्याच्या आकड्यांची अचूकता ठरते. एक्झिट पोलचे आकडे चुकू शकतात पण त्यांचा ट्रेंड महत्त्वाचा असतो.”

वागळे म्हणाले, की हे आकडे वेगळेच दाखवत होते, या बद्दल आश्चर्य काहीच नाही. ‘माय अॅक्सिस’ वगळता बाकीचे एक्झिट पोल करणारे लोक बोगस आहेत. ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्यामुळे ते कोणासाठी तरी उपयोग व्हावा म्हणून आकडे जाहीर करतात. ‘माय अॅक्सिस’चे लोक काम करतात. त्यांचे आकडे बऱ्यापैकी जवळ जाणारे आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणाले, “इंडिया टुडे – माय अॅक्सिस’चे आकडे हे वास्तवतेच्या जवळ जाणारे होते. इतर संस्थांनी मतदारांचे जे सर्वेक्षण केले, ते कुठे आणि कसे केले, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे आकडे जुळलेले दिसत नाहीत. मतदानाचे प्रमाण नमुना आकार (sample size) म्हणजे अमी झालेले आहे. त्यातच नमुना आकार

अभय देशपांडे

अभय देशपांडे

(sample size) फुगवून सांगण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय एकाने सर्वेक्षण करून आकडे जाहीर केले, की त्या आकड्यांशी साधर्म्य साधण्यासाठी इतर संस्था आपले आकडे जुळवून सांगताना दिसतात.”

देशपांडे म्हणाले, की पूर्वी मतदारांकडे दोनच पर्याय होते आता मात्र अनेक पर्याय असल्याने एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे येऊ शकतात. शिवाय ग्रामीण आणि शहरी असाही फरक असतो, तो सर्वेक्षण करताना लक्षात घेणे आवश्यक असते.

देशपांडे पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला २२७ मतदारसंघात मिळून ५७ टक्के मते मिळाली होती. त्याचाही आधार घेतला गेला असावा. ती मते यावेळी ८ टक्क्यांपर्यंत कमी झालेली आहेत. अपक्ष आणि इतर पक्ष ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मनसे अशा सगळ्यांनी मिळून २६ टक्के मते घेतली आहेत. त्याचाही अंदाज आला नसावा.”

हरियाणातही एक्झिट पोल उलटा

हरियाणात ९० पैकी ७५ विधानसभा जागा जिंकण्याचे ‘मिशन’ भाजपचे होते. तेथे ही किमया भाजप सहज साधेल असे सर्व एक्झिट पोलचे अंदाज होते. या सगळ्या आकड्यांमध्ये दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) नाव नव्हते.

प्रत्यक्षात भाजपला ४० जागा मिळाल्या. काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या, ‘जेजेपी’ला १० जागा मिळाल्या.

सर्व एक्झिट पोलचे आकडे

क्र. संस्था भाजप काँग्रेस इतर
एबीपी-सी व्होटर ७२
सीएनएन-आयपीएसओएस ७५ १०
जन की बात ५७ १७
टीव्ही९ भारतवर्ष ४७ ११
न्यूज एक्स ४७ २३
इंडिया न्यूज ७५
टाइम्स नाऊ ७१ ११
एकूण सरासरी ६६ १४ आरएनएलडी – २

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0