कर्जमाफी देऊनही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कर्जमाफी देऊनही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नवी दिल्लीः २०१७ मध्ये कर्जमाफी घोषित करून अन्य कल्याणकारी योजना राबवूनही महाराष्ट्रात २०१९मध्ये देशातील सर्वाधिक, ३९२७ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची

व्हिलेज डायरी : सुरुवातीची अखेर
शेतकरी आत्महत्या, पत्रात पंतप्रधान मोदींवर आरोप
व्हिलेज डायरी भाग नऊ : आणि कैफीयती

नवी दिल्लीः २०१७ मध्ये कर्जमाफी घोषित करून अन्य कल्याणकारी योजना राबवूनही महाराष्ट्रात २०१९मध्ये देशातील सर्वाधिक, ३९२७ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे रिकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)तून पुढे आली आहे.

एनसीआरबीच्या माहितीनुसार देशातल्या अनेक राज्यांच्या तुलनेत आत्महत्या करणार्यांमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकर्यांची संख्या अधिक आहे.

२०१६मध्ये देशात एकूण ११,३७९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती त्यात महाराष्ट्रातील संख्या ३,६६१ होती. २०१९मध्ये महाराष्ट्रात ३,९२७ शेतकर्यांनी आत्महत्या केली जी २०१६ च्या तुलनेत २६६ ने अधिक होती.

२०१४मध्ये ४ हजार, २०१५मध्ये ४,२९१ इतक्या शेतकर्यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी दुष्काळ, पीक नुकसान, कर्जातील वाढ व अन्य कारणे शेतकर्यांच्या आत्महत्येमागील होती.

२०१७मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. त्या अंतर्गत राज्य सरकारने ३४,०२२ कोटी रु.ची कर्जमाफी शेतकर्यांना दिली होती.

या संदर्भात द वायर ने एक माहिती प्रसिद्ध केली होती त्यानुसार राज्यातील ४८.०२ लाख शेतकर्यांना १९,८३३.५४ कोटी रु.ची कर्जमाफी देण्यात आली होती.

त्यानंतर गेल्या डिसेंबरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. या सरकारने म. ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0