महाराष्ट्राला ५१ ‘पोलिस पदकं’

महाराष्ट्राला ५१ ‘पोलिस पदकं’

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना पोलिस पदक पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ४ पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेव

अहमदाबादेत मुख्य रस्त्यांवर मांसाहार बंदी
‘१९८९-२०२१ दरम्यान ८९ काश्मीर पंडितांची हत्या’
शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिलेला धडा

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना पोलिस पदक पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ४ पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, ७ जणांना ‘पोलिस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता अन्य ४० जणांना ‘पोलिस पदक’ जाहीर झाली आहेत.

बाळू देशमुख

बाळू देशमुख

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलिस पदक’ जाहीर करते. या वर्षी देशात एकूण ९३९ ‘पोलिस पदक’ जाहीर झाली असून ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलिस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५१ पदके मिळाली आहेत.

देशातील ८८ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.      

प्रल्हाद खाडे

प्रल्हाद खाडे

राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम)

  • विनय महादेवराव करगावकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक (पीसीआर), जुने कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई.
  • प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट एसआरपीएफ, गट ६, धुळे.
  • चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलिस निरीक्षक, पीटीसी नानवीज, दौंड, पुणे.
  • अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलिस उपनिरीक्षक एस.पी. नांदेड

राज्यातील एकूण ७ पोलिसांना पोलिस शौर्य पदक

१. गोपाळ मनिराम उसेंडी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

२. महेंद्र गानु कुलेटी, नाईक पोलिस हवालदार

३. संजय गणपत्ती बकमवार, पोलिस हवालदार

४. भरत चितांमण नागरे, पोलिस उपनिरीक्षक

५. दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलिस हवालदार

६. निलेश्वर देवाजी पड, नाईक पोलिस हवालदार

८. संतोष विजय पोटवी, पोलिस हवालदार.

विनय कारगावकर

विनय कारगावकर

राज्यातील एकूण ४० पोलिसांना पोलिस पदक

१.राजेश प्रधान, विशेष पोलिस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, दादर, मुंबई.

२. चंद्रकांत महादेव जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त, सीपी मीरा भाईंदर, वसई, विरार.

३. सीताराम लक्ष्मण जाधव, पोलिस उपअधीक्षक (वायरलेस), एडीजीपी आणि संचालक कार्यालय (संपर्क आणि वाहतूक), पुणे.

४. भारत केशवराव हुंबे, पोलिस निरीक्षक, ए. सी. बी. परभणी

५. गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, निरीक्षक, पोलिस अधीक्षक कार्यालय, लातूर.

६. अजयकुमार सूर्यकांत लांडगे, पोलिस निरीक्षक, सीपी, नवी मुंबई.

७. जितेंद्र यशवंत मिसाळ, पोलिस निरीक्षक सी.पी. मुंबई.

८. विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा, पोलिस निरीक्षक एस.पी.सी.आय.डी. नागपूर.

९. जगदीश जगन्नाथ कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सी.पी., नवी मुंबई.

१०. सुरेंद्र गजेंद्र मलाले, पोलिस निरीक्षक सी.पी. औरंगाबाद शहर.

११. प्रमोद हरिराम लोखंडे, सहायक कमांडंट, एसआरपीएफ गट ४, नागपूर.

१२. मिलिंद गणेश नागावकर, सहायक पोलिस निरीक्षक, मुख्य गुप्तचर अधिकारी,एसआयडी. मुंबई.

१३. शशिकांत दादू जगदाळे, पोलिस निरीक्षक सीपी, मुंबई शहर.

१४. रघुनाथ रामचंद्र निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक, सी.पी. मुंबई शहर.

राजेश प्रधान

राजेश प्रधान

१५. संजय अण्णाजी कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक, सीपी नाशिक शहर.

१६. राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल, पोलिस उपनिरीक्षक, सी पी नागपूर शहर.

१७. प्रकाश भिला चौधरी, पोलिस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर.

१८. नंदकिशोर शांताराम सरफरे, पोलिस उपनिरीक्षक सी.पी मुंबई शहर.

१९. राजेश रावणराव जाधव, पोलिस उपनिरीक्षक, एसपी परभणी.

२०. शिवाजी विठ्ठल देसाई, पोलिस उपनिरीक्षक सी.पी. मुंबई शहर.

२१. राजाराम धर्मा भोई, पोलिस उपनिरीक्षक, एसपी जळगाव.

२२. देवेंद्र परशराम बागी, पोलिस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर.

२३. संभाजी सुदाम बनसोडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एस.पी. सातारा.

प्रशांत रणपिसे

प्रशांत रणपिसे

२४. बबन नारायण शिंदे, चालक, सहा. पोलिस उपनिरीक्षक, एच. एस. पी. एस. पी. कोल्हापूर.

२५. पांडुरंग लक्ष्मण वांजळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर.

२६. विजय उत्तम भोग, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर.

२७. पांडुरंग पंढरीनाथ निघोट, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी नवी मुंबई.

२८. राजेंद्र कृष्ण चव्हाण सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर.

२९. अनिल पांडुरंग भुरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एस.पी. भंडारा.

३०. संजय एकनाथ तिजोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर.

३१. रविकांत पांडुरंग बडकी, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी यवतमाळ.

३२. अल्ताफ मोहिउद्दीन शेख, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर.

३३. सत्यनारायण कृष्णा नाईक, सहायक पोलिस निरीक्षक, सीपी मुंबई शहर.

३४. बस्तर लक्ष्मण मडावी, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी गडचिरोली.

३५. काशिनाथ मारुती उभे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एटीएस पुणे.

३६. अमरसिंग वसंतराव भोसले, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसीबी कोल्हापूर.

३७. आनंदराव गोपीनाथ कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी सांगली.

३८. मधुकर हरिश्चंद्र पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर.

३९. सुरेश मुरलीधर वानखेडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी नागपूर शहर.

४०. लहू मनोहर राऊत, सहायक पोलिस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर.

राज्यातील ७ अग्निशमन अधिकाऱ्यांना अग्निशमन सेवा पदक’ जाहीर 

अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या एकूण ४२ अधिकारी –कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये ‘अग्निशम सेवा पदक’ जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बाळू देशमुख यांना मरणोत्तर राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक

अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. तर मुख्य अग्निशमन अधिकारी  प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे.

राज्याला पाच अग्निशमन सेवा पदक

उत्कृष्ट सेवेसाठी  राज्यातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. यात मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील आणि संजय म्हमूनकर तसेच अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचा समावेश आहे.

देशभरातील अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या अग्निशमन सेवा पदकांमध्ये एक ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, शौर्यासाठी दोन ‘अग्निशमन सेवा पदक’, विशिष्ट सेवेसाठी नऊ ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’  आणि  उत्कृष्ट सेवेसाठी  ३० ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: