फडणवीस सरकार कोसळले

फडणवीस सरकार कोसळले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बहुमताच्या अभावी राजीनामा दिल्याने औट घटकेचे फडणवीस सरकार चार दिवसांत कोसळले. आज दुपा

पावसाळी अधिवेशनात १० महत्त्वाची विधेयके मंजूर
काश्मीरमध्ये ‘जैश’च्या हल्ल्यात २ पोलिस शहीद
पाश्चिमात्य देशच युद्धखोरः पुतीन यांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बहुमताच्या अभावी राजीनामा दिल्याने औट घटकेचे फडणवीस सरकार चार दिवसांत कोसळले. आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनीच आपण राजीनामा देत असल्याची पत्रकारपरिषदेत घोषणा केली.

दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर फडणवीस यांनी साडेतीन वाजता पत्रकारपरिषदेत आपल्याकडे बहुमत नसल्याने राजीनामा देत असल्याची घोषणा केली. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत आणि भाजपला जनादेश दिला. भाजपला अधिक मोठा जनादेश होता. जनतेच्या मनातील सरकार बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला. शिवसेनेला नंबर गेम आणि बार्गेनिंग करू शकतो, असे लक्षात आले. ते पहिल्या पत्रकारपरिषदेपासून त्यांनी तसे संकेत दिले. शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे कधीही ठरले नव्हते. ते आमच्याशी कधीही बोलले नाहीत. जे मातोश्रीच्या बाहेर कधी जात नाही, ते अनेकांचे उंबरे झिजवू लागले. त्याच दरम्यान अजित पवार यांनी आम्हाला पत्र दिले. म्हणून आम्ही सरकार स्थापन केले. आता अजित पवार यांनी मला भेटून यापुढे या आघाडीमध्ये राहणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”

एकमेकांशी संबंध नसलेले पूर्णपणे तीन भिन्न पक्ष किमान सामान कार्यक्रमावर चर्चा करीत राहिले. तो किमान सामान कार्यक्रम नसून भाजपला बाहेर ठेवण्याचा कार्यक्रम आहे. या तीन पक्षांचे सरकार स्वतःच्याच दबावामध्ये पडेल. हे महाराष्ट्राची स्थिती काय करतील हे सांगता येत नाही. आम्ही यापुढे जबाबदार विरोधी पक्षांचे काम करू. जनतेचे काम पुढे नेऊ, असे फडणवीस म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0