‘परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा माहिती नाही’

‘परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा माहिती नाही’

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. परमबीर सिंग यांच्याविरोधात पोलिस अधिकारी भीमराव घाडगे यांनी दाखल केलेल्या अट्रॉसिटीच्या व भ्रष्टाचाराच्या केसची सुनावणी सुरू आहे. त्या संदर्भात सिंग यांचा ठावठिकाणा मिळत नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता येत नाही, असे राज्य सरकारने न्यायालयाने सांगितले.

परमबीर सिंग यांच्यातर्फे त्यांचे वकील महेश जेठमलानी यांनी, परमबीर सिंग यांना अद्याप फरार घोषित करण्यात आलेले नाही. त्यांना पाठवलेल्या दोन समन्सचे त्यांनी उत्तर दिले असल्याचे न्यायालयाला सांगितले.

या महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने परमबीर सिंग यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. परमबीर सिंग त्यांच्या घरात राहात नसल्याचे दिसून आले आहे. त्याच बरोबर केंद्र व राज्याच्या तपास यंत्रणांनी त्यांना अनेक वेळा समन्स पाठवूनही ते हजर झाले नसल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रसार माध्यमांमध्ये परमबीर सिंग हे देश सोडून पळून गेल्याच्या चर्चा सुरू आहेत पण याला अधिकृत पुरावा मिळालेला नाही.

परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचार व अट्रॉसिटीचे आरोप असून पैशाची वसुली व अन्य गुन्हे केल्याचेही आरोप लावण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS