विधान परिषदेच्या ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांची मुदत 1 जानेवारी, 2022 रोजी समाप्त होत आहे. या रिक्त हो

उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय आत्मघातकी
बंगालची निवडणूक आणि भारताचे राजकीय भवितव्य
भाजपवर निवडणूक आयोग मेहेरबान

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांची मुदत 1 जानेवारी, 2022 रोजी समाप्त होत आहे. या रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला.

या सहा जागांसाठी शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तसेच मंगळवार 14 डिसेंबर, 2021 मतमोजणी केली जाईल. या निवडणूकीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरुवार 16 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण होईल.

रामदास गंगाराम कदम (मुंबई), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), सतेज उर्फ बंटी डी पाटील (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम),  गिरीशचंद्र बच्छराज व्यास (नागपूर) हे सदस्य 1 जानेवारी 2022 रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिवस 23 नोव्हेंबर (मंगळवार) 2021 आहे. 24 नोव्हेंबर 2021 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवार,  26 नोव्हेंबर,2021 असा आहे.

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर 

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दिवंगत शरद नामदेव रणपिसे यांचे 23 सप्टेंबर 2021 रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेकरिता मतदान 29 नोव्हेंबर 2021 (सोमवार) रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत व मतमोजणी त्याच दिवशी 29 नोव्हेंबर 2021 (सोमवार) रोजी सायंकाळी 5.00 वाजता होणार आहे.

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिवस मंगळवार,  16 नोव्हेंबर 2021 आहे. बुधवार 17 नोव्हेंबर 2021 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस सोमवार,  22 नोव्हेंबर,2021 असा आहे. या निवडणूकीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बुधवार 1 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण होईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0