महाराष्ट्र पोलिसांनी नुपूर शर्मा, नवीन जिंदालला समन्स बजावले

महाराष्ट्र पोलिसांनी नुपूर शर्मा, नवीन जिंदालला समन्स बजावले

ठाणे/पुणे/नवी दिल्ली: महाराष्ट्रातील भिवंडी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आ

फेसबुकची भाजपवर मेहरनजर – ‘वॉल स्ट्रीट’चे वृत्त
बिहारमध्ये जदयु – भाजपमध्ये लव्ह जिहाद !
नवं भागवत पुराण

ठाणे/पुणे/नवी दिल्ली: महाराष्ट्रातील भिवंडी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सोमवारी तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.

याशिवाय भाजपचे हकालपट्टी केलेले कार्यकर्ते नवीन कुमार जिंदाल यांनाही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पोलिसांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या कथित वादग्रस्त ट्विटबद्दल १५ जून रोजी त्यांचे जबाब नोंदवण्यास सांगितल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे यांनी पत्रकारांना सांगितले.

रझा अकादमीच्या प्रतिनिधीने ३० मे रोजी तक्रार केल्यानंतर भिवंडी पोलिसांनी नुपूर शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्माला २२ जून रोजी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यासंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते.

याशिवाय, मुंबई पोलिसांनी नुपूर शर्मालाही समन्स बजावले असून, तिला २५ जून रोजी या प्रकरणातील जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रझा अकादमीचे सहसचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून २८ मेच्या रात्री दक्षिण मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्यात शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषितांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना अटक करण्याची मागणी करत १० जून रोजी देशभरातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली होती.

पुणे पोलिसांनी नवीन कुमार जिंदाल यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला

दरम्यान, भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या पक्षाच्या दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांच्याविरोधात पुणे शहरात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत जिंदालविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.

स्थानिक रहिवासी झाकीर इलियास शेख यांच्या तक्रारीवरून शहरातील कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ते म्हणाले, की जिंदाल यांनी १ जून रोजी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट करून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे जिंदालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जिंदाल यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम १५३ ए (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे), १५३ बी (राष्ट्रीय एकात्मतेला प्रतिकूल विधान करणे), २९५ ए (धर्म आणि धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेले कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ५०५(२) (सार्वजनिक ठिकाणी दंगल घडवून आणणारे विधान), २९८ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे इ.) या कलमान्वये एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात कोडवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: