महाराष्ट्र, पंजाबमध्ये कर्फ्यू, राज्यात सर्व जिल्हा सीमाबंद

महाराष्ट्र, पंजाबमध्ये कर्फ्यू, राज्यात सर्व जिल्हा सीमाबंद

मुंबई/ नवी दिल्ली : १४ तासांच्या जनता कर्फ्यूनंतर केंद्र सरकारने देशातील करोनाबाधित ८० जिल्हे येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेतला

लॉकडाऊन : केंद्राचे पॅकेज आणि तृतीयपंथी समुदाय
कोरोना लढाः मोदी सरकारचा महाराष्ट्राशी दुजाभाव
प्रेमाची आर्त गोष्ट

मुंबई/ नवी दिल्ली : १४ तासांच्या जनता कर्फ्यूनंतर केंद्र सरकारने देशातील करोनाबाधित ८० जिल्हे येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या जिल्ह्यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. त्याचबरोबर देशांतर्गत विमानसेवाही बुधवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलेली आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा, राजस्थान, पंजाब, चंदीगड, आंध्र प्रदेश, झारखंड राज्ये संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आलेली आहेत. संसदेची दोन्ही सभागृहेही स्थगित करण्यात आलेली आहेत.

देशात करोनाचे रुग्ण ४३३

देशात करोना बाधित रुग्णांची संख्या सोमवारी रात्री अखेर ४३३ असून ८ मृत्यू झाले आहेत. कोलकात्यामध्ये ८ व्या कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

देशातल्या २०० जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती ५० दिवसांनंतर मिळाली पण नंतरच्या २०० करोना बाधित रुग्णांची संख्या केवळ तीन दिवसांत उघडकीस आली आहे.

महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत कर्फ्यू

महाराष्ट्र सरकारने सोमवारी सर्व जिल्ह्यांच्या सीमाबंद करत ३१ मार्च अखेर कर्फ्यू घोषित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हद्वारे राज्याच्या जनतेशी संपर्क साधत रविवारी जनता कर्फ्यूनंतर जो गोंधळ लोकांनी घातला त्यावर जनतेची सौम्य शब्दांत कानउघडणी केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी रविवारी जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिला. मात्र, यासोबतच अनेक बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी होते, हे ध्यानात ठेवा. आज अनेक भागांत लोकांनी रस्त्यावर उतरून विनाकारण गर्दी केल्याचे तसेच वाहनेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळेच राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मला घ्यावा लागत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

करोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे. मी काळजीपोटीच आपल्याला या सूचना देत आहे. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. करोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगभरात जसे सुरू आहे तसेच थैमान महाराष्ट्रात माजेल, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी खासगी वाहने अत्यावश्यक कारण असेल तरच सुरू राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल, असे स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0