दहावीचा निकाल ९६.९४ टक्के

दहावीचा निकाल ९६.९४ टक्के

मुंबईः यंदाचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के अधिक आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्

१०वी, १२वीच्या खासगी विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार
इयत्ता १०वी व १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

मुंबईः यंदाचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के अधिक आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने, धैर्याने, संयमाने व परिश्रमाने अभ्यास पूर्ण करत दहावीची परीक्षा दिली.

दरम्यान या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती समर्पणभावाला सलाम,” अशा भावना शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केल्या आहेत.

या परीक्षेत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६८,९७७ नियमित विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२१,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६,५०,७७९ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, ५,७०,०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर २,५८,०२७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील १२,२१० शाळांचा आणि २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांची कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.२७ अशी सर्वाधिक असून सर्वांत कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० टक्के अशी आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ असून मुलांची ९६.०६ एवढी आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे इ.१० वीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तर मार्च २०२० मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.३० अशी होती. याचाच अर्थ मार्च-एप्रिल २०२२चा निकाल मार्च २०२० तुलनेत १.६४ टक्के वाढला आहे.

या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत त्यांना श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत लगतच्या दोन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. मार्च २०२२ च्या परीक्षेस प्रथमच नियमित विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या) जुलै-ऑगस्ट २०२२ व मार्च २०२३ च्या परीक्षेस श्रेणीसुधार साठी प्रविष्ट होण्याच्या दोन संधी देण्यात येणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: