गांधीजींचा न संपणारा शोध…

गांधीजींचा न संपणारा शोध…

ख्यातनाम अमेरिकी पत्रकार लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : हिज लाईफ अ‍ॅण्ड टाइम्स’ या चरित्राचा मराठी अनुवाद वि. रा. जोगळेकर यांनी केला असून तो साधना प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केला जात आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १ सप्टेंबर २०१९ रोजी पुण्यात एस. एम. जोशी फाउंडेशन सभागृह, नवी पेठ येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संपादक पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर हे असून अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आहेत.

हिंदुत्व शिकवू नये; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना प्रत्युत्तर
पाकिस्तानकडून साखर, कापसावरची आयातबंदी मागे
ईव्हीएमवर राज ठाकरे यांचा निशाणा

गांधीजींची आठवण यंदा केवळ त्यांची आणि कस्तुरबांची १५०वी जयंती आहे, म्हणूनच आपण करतो आहोत, असे नाही. विशेषतः २१ वे शतक सुरू झाल्यावर संपूर्ण जगभरात गांधीजींचे नाव नव्याने घेतले जाऊ लागले. अनेक संस्थांनी, माध्यमांनी २०व्या शतकातील महान व्यक्ती म्हणून त्यांचे नाव पुन्हा एकदा अधोरेखित केले. ज्या महात्म्याने शांततेचा पुरस्कार केला, सत्याग्रहाचे अहिंसक साधन स्वीकारले, त्या या महापुरुषाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही, ही चर्चादेखील नंतर झाकोळून गेली. कारण गांधीजींचे विचार आणि त्यांचा अहिंसेचा मार्ग संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व देशांचे प्रतिनिधी असलेल्या आमसभेने स्वीकारला आणि त्यांची जयंती (२ ऑक्टाेबर) ‘अहिंसा दिन’ म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.

गांधीजींच्या मार्गाने राजकीय आणि सामाजिक जीवनात वाटचाल करणारे आपल्या सर्वांचे लाडके साने गुरुजी यांच्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या प्रकाशन संस्थेमार्फत या वर्षी गांधीजींच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या एका चरित्रग्रंथाचा अनुवाद प्रकाशित होतोय, हे सर्वार्थाने त्यांचे सुयोग्य स्मरण आपण करतो आहोत, असेच म्हटले पाहिजे.

सुविख्यात पाश्चिमात्य पत्रकार असलेले अमेरिकेतील लुई फिशर यांनी ‘महात्मा गांधी : हिज लाईफ अ‍ॅण्ड टाइम्स’ हे चरित्र लिहिले आणि ते १९५१ साली प्रकाशित झाले. साधना प्रकाशनाने या ग्रंथाचा मराठी अनुवाद ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या नावाने प्रसिद्ध केला असून, सांगलीचे एक जाणकार वि. रा. जोगळेकर यांनी तो केला आहे. साधना प्रकाशनाने आणि जोगळेकर यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय विद्याभवनने फिशरलिखित मूळ इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केला आहे. माझ्याकडे जवळपास त्याच स्वरूपातील फिशर यांच्या गांधी चरित्राची जी प्रत आहे, ती मात्र हार्पर कॉलिन्स यांनी प्रकाशित केली आहे. त्यामुळे अनुवाद आणि मूळ पुस्तकातील प्रकरणांचे भाग पाहताना किंचित फरक झाल्याचे लक्षात येते. प्रकरणांची शीर्षके आणि एकूण तपशील यात मात्र अजिबात फरक नाही, हे येथे सांगायला हवे.

गांधीजींच्या हयातीत आणि नंतर प्रकाशित झालेल्या चरित्र ग्रंथांचा एक आढावा संदर्भासाठी घेतला पाहिजे. युरोपातील एक लेखक व विचारवंत रोमा रोलाँ यांनी गांधीजींचे एक वैचारिक चरित्र लिहिले ते १९२४ साली प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे त्यानंतर आठ वर्षांनी प्रत्यक्ष रोलाँ आणि गांधीजींची भेट झाली. गांधीजींचे मराठीमधील पहिले  चरित्र १९१८ साली प्रकाशित झाले आणि मुंबईच्या अवंतिकाबाई गोखले यांनी ते लिहिले होते. चंपारण्य सत्याग्रहात गांधींच्या निरोप्याप्रमाणे त्या रचनात्मक कामासाठी आपले यजमान बबन गोखले यांच्यासह बिहारला गेल्या होत्या. या पुस्तकाला लोकमान्य टिळकांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. यानंतर अर्थातच लुई फिशर यांच्या ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल. याच दरम्यान म्हणजे १९५१-५२ मध्ये गांधीजींचे एक सहकारी आणि चरित्रकार डी. जी. तेंडुलकर यांनी ‘महात्मा’ हे अष्टखंडीय बृहत्चरित्र लिहून पूर्ण केले. त्याला पंडित  नेहरुंची हृदयस्पर्शी प्रस्तावना असून भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने हे आठखंडीय चरित्र प्रकाशित केले आहे. साधारणतः फिशर यांच्या काळातच विल्यम शिरर या ब्रिटिश लेखकाने आणि पत्रकाराने स्वातंत्र्यलढा कव्हर करतानाच गांधीजींची भेट घेतली आणि नंतर त्याने ‘गांधी – ए मेमॉयर’ हा ग्रंथ लिहिला, पण तो उशीरा प्रसिध्द झाला.

त्यानंतर मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात गांधीजींची चरित्रे प्रकाशित झाली. विख्यात हिंदी लेखक गिरीराज किशोर यांनी लिहिलेले गांधी चरित्र (‘पहला गिरिमिटया’) विशेषत्वाने नोंदवले पाहिजे. ऑस्ट्रेलियातील प्राध्यापक थॅामस वेबर यांची गांधींवरची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

अथार्तच इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी लिहिलेले ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाने आपल्या सर्वांनाच पुन्हा एकदा गांधींचे वेगळेपण समजावून सांगितले. गुहा यांनी लिहिलेले आणि गेल्याच वर्षी प्रकाशित झालेले ‘गांधी – द इयर्स दॅट चेंज्ड वर्ल्ड -(१९१४-१९४८)’ हे पुस्तक गांधीजींच्या जागतिक स्थानाला अधोरेखित करू पाहते. गांधीजींचे भारतात १९१५मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आगमन झाल्यानंतर ते त्यांच्या हत्येपर्यंतचा म्हणजे जवळपास ३४ वर्षांचा लेखाजोखा या पुस्तकात गुहांनी मांडला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एकाच वेळी देशातील आणि जगातील मोठे नेते, बुद्धिवंत, विचारवंत ‘गांधी’ या केंद्राभोवती एकवटलेले होते, असे जगाच्या इतिहासात घडलेले दिसत नाही, हे निरीक्षण रामचंद्र गुहांनी नोंदवले आहे. त्यामुळेच या ग्रंथाचे आणखी वेगळे मोल आहे.

आता आपण लुई फिशर यांच्या ग्रंथाकडे वळूयात. गांधीजींच्या हत्येनंतर जवळपास तीन वर्षातच फिशर यांचा हा ग्रंथ प्रकाशित झाला, हे लक्षात घेतले तर त्यांच्या लेखनातील गांधींबद्दलचा आदर आणि आपुलकी यांचे मर्म सहज उमगते. फिशर यांच्या ग्रंथाचा प्रभाव ‘गांधी’ चित्रपट निर्माण करणारे विख्यात दिग्दर्शक सर रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्यावर फार मोठा होता आणि या पुस्तकामुळेच आपले आयुष्य बदलून गेले आणि आपण गांधींवर चित्रपट काढायचे ठरविले, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. फिशर यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे बातमीदार म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे कव्हरेज केले होते. त्यासाठी ते भारतात आल्यावर गांधीजींशी त्यांची भेट झाली. सेवाग्राम आश्रमात ते गांधीजींसह आठवडाभर तेथे राहिले होते. या चरित्रग्रंथाखेरीज फिशर यांनी ‘ए वीक वुइथ गांधी’, ‘गांधी अ‍ॅण्ड स्टॅलीन’, ‘गांधी : हिज लाईफ अ‍ॅण्ड मेसेज फॉर द वर्ल्ड’ आणि ‘द इसेन्शियल गांधी – अ‍ॅन अ‍ॅन्थाॅलॉंजी (संपादित)’ ही पुस्तकेही लिहिली आहेत.

‘द लाईफ ऑफ महात्मा गांधी’ या फिशर यांच्या ग्रंथात एकूण तीन भाग आहेत. पहिल्या भागात १५ प्रकरणे, दुसऱ्या भागात २५ प्रकरणे आणि ितसऱ्या भागात १० प्रकरणे आहेत. वि.रा.जोगळेकर यांनी भारतीय विद्याभवनच्या ज्या ग्रंथाचा हा अनुवाद केला आहे, त्यातही दोन भाग केलेले असले तरी प्रकरणे फिशर यांच्या ग्रंथाप्रमाणेच ५० झाली आहेत. हा भाग केवळ संदर्भासाठी सांगितला. मुळात फिशर यांनी गांधीजींचे हे चरित्र लिहिताना ज्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे अशा महात्म्यांचे चरित्रलेखन करताना सहसा त्याची शरीरयष्टी किंवा अनुषंगिक तपशील फारसे दिले जात नाही. फिशर यांनी गांधीजींच्या लांबसडक पायांबद्दल लिहिताना ‘लाँग, थिन फर्म लेग्ज’ असे शब्द वापरले आहेत. गांधीजींची त्वचा चॉकलेट रंगाची, मऊ आणि हेल्दी होती, असेही ते लिहितात. गांधीजींचे शरीर म्हातारे झालेले आहे, असे दिसत नसे. तसेच आपण म्हातारे आहोत, हे इतरांना वाटू नये अशीही काळजी गांधीजी घेत. त्यांच्या डोक्यावर असलेल्या तुरळक पांढऱ्या केसांमुळे त्यांचे वय लक्षात येत असे. गांधींचे डोळे आणि त्यांचे हात सुंदर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसत, असेही फिशर यांनी लिहिले आहे.

एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे जगावेगळा लढ्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या गांधींबद्दल जगभरातील बुिद्धवंतांत आणि पत्रकारांच्या जगात विशेष कुतूहल होते. ज्यांना गांधीजींचा सहवास लाभला अशा फिशर आणि शिरर या पत्रकारांनी जागितक स्तरावर गांधीजींची प्रितमा आपल्या लेखनातून उभी केली. लुई फिशर यांनी जी जगभर मुशािफरी केली होती, त्याचे प्रतिबिंब गांधींच्या चरित्रग्रंथात आपल्याला दिसते. त्यांचे माेठेपण मांडत असतानाच एखादा कमकुवत दुवाही अधाेरेिखत करायला ते विसरत नाहीत. कस्तुरबांची भेट आणि गांधींबराेबरचा अन्य भारतीय नेत्यांचा संवाद, ब्रिटीश सत्तेचे प्रतिनिधी या सर्वांच्या बराेबरचा एक व्यापक पट या ग्रंथात उलगडत जाताे.

वि. रा. जाेगळेकर आणि साधना प्रकाशन यांनी लुई फिशर यांच्या या चरित्रग्रंथाचा अनुवाद करून अतिशय माेठे याेगदान दिले आहे. गांधीजींचा हा चरित्रपट मराठीत आणण्याची गरज होतीच. शिवाय मूळ इंग्रजी ग्रंथ हा सुमारे सातशे पानांचा असल्यामुळे ते तसे साेपे नव्हते. जिद्द, चिकाटी, आणि आपल्या कामावरची निष्ठा यांमुळेच ऐंशी ओलांडलेल्या जोगळेकर यांनी  मराठी अनुवाद साहित्याला या ग्रंथाने खराेखर समृद्ध केले आहे. फिशर यांच्या ग्रंथातील अनेक संदर्भ समजावून घेत अतिशय नेटकेपणाने हा अनुवाद झाल्यामुळे मराठी वाचकांना गांधी चिरत्राची एक तपशीलवार अशी ओळख यामुळे होणार आहे.

फिशर यांच्या ग्रंथातील उत्तरार्धातील प्रकरणांचा जाेगळेकर यांनी केलेला अनुवाद मुद्दाम पाहायला हवा. कारण भारतीय स्वातंत्र्याचे निर्णायक पर्व याच कालखंडात आहे. अहमदाबादमध्ये वल्लभभाई पटेल यांच्याशी गांधींची झालेली ओळख आणि त्यानंतर बारडाेलीच्या सत्याग्रहासाठी त्यांनी केलेली तयारी हा भाग मुळातून वाचायला हवा. वाढीव शेतसारा रद्द करण्याचे हे आंदाेलन होते. त्यानंतरच्या काळातील हिंसात्मक राजकारणाला गांधीजींनी केलेला विराेध आणि त्याची एक वैचािरक पिरणती नवी दिल्लीत भरलेल्या आशियाई पिरषदेमध्ये कशी झाली, हा एक फार माेठा कालपट अनुवादरूपात वाचतानाही खूप समाधान होते.

गांधींच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक व्यिक्तमत्वांचा प्रभाव, भगवद्गगीतेची शिकवण, गांधींची उपाेषणे आणि गांधींची कुटुंबे असे अनेक विषय जाेगळेकरांनी फार जाणीवपूवर्क अनुवादित केली आहेत. गांधीजींचा पिहला उपवास, सत्याग्रहाची सुरुवात, तुरुंगवास, टाॅलस्टाॅय आणि गांधीजी हे विषयही यात येतात. गांधींनी अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी पहिल्यांदा उपवास केला. या संपातील कामगारही त्यांच्याबराेबर उपवासात सहभागी झाले.

‘गांधी’चित्रपटात शेळीच्या दुधासंबंधी गांधी सांगतात, ताे विषयही फिशर यांच्या या पुस्तकात आहे. शिवाय गांधींचे निसर्गोपचाराचे प्रयाेग आणि ब्रिटीश सत्ताधाऱ्यांबराेबरची चर्चा हे विषयही तितक्याच सहजपणे या अनुवादात आले आहेत.

गांधींमुळे प्रभावित झालेल्या अनेक विदुषी आणि गांधींची आश्रम जीवनपद्धती याचा शाेध अनेकांनी घेतला आहे. पाश्चात्य लेखकांना साहिजकच त्यामुळे या विषयात विशेष रस असे. या पाश्वर्भूमीवर फिशर यांच्या ग्रंथातील गांधींची कुटुंबे हे प्रकरण वाचले पाहिजे. आश्रम जीवनपद्धतीमुळे गांधींचे कुटुंब िकती विस्तारलेले होते, याची एक झलक यात वाचायला मिळते शिवाय गांधी-कस्तुरबा संबंधाबाबतही फिशर यांनी काहीनिरीक्षणे नाेंदिवली आहेत, त्याचेही महत्त्व आपल्या लक्षात येते.

जाेगळेकर यांनी केलेल्या अनुवादातील या प्रकरणांतील कस्तुरबांबाबतचा हा तपशील वाचा – ‘‘आपण गांधींच्या पत्नी आहोत म्हणून कधीच त्याचा व्यक्तिगत फायदा बांनी करून घेतला नाही. कष्टाची अवघड कामे टाळली नाहीत. तरुण वा मध्यम वयाच्या िस्त्रयांच्यात त्यांचा पतीचा वावर झाला तरी, त्याबद्दल कधी त्यांनी असूया केली नाही. स्वतःचे व्यिक्तमत्व राखून देखील त्यांनी गांधींची सावलीप्रमाणे पाठराखण केली. ती एकवैशिष्ट्यपूर्ण स्त्री होती. भगवद्गगीतेमध्ये सांगितलेले निस्पृहतेचे तत्वज्ञान गांधींच्यापेक्षाही त्यांच्यात पुरेपूर आकळले होते काय असा प्रश्न त्यांच्या दीर्घकाळ निकट असलेल्या लाेकांना पडे.’’

याच प्रकरणात गांधींचे आणि त्यांच्या मुलांचे संबंध याबाबत फिशर यांनी लिहिले आहे. हरिलाल, मिणलाल यांच्याबाबतची निरीक्षणे यात आहेत. (अनुवादपर पुस्तकात हिरलाल ऐवजी अनेक ठिकाणी हिरालाल उल्लेख आलेला आहे, ताे चुकीचा आहे.)

गांधीजींचा हा अनुवाद चरित्रग्रंथ प्रकाशित होताेय आणि ताेही कस्तुरबा आणि गांधींच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त. याच वर्षी गांधींच्या पुण्यितथीदिनी काही समाजकंटकांनी गांधीहत्येचे प्रात्यिक्षक करून दाखिवले आणि जगभर ताे तमाशा गेला. या तमाशाच्या विरुद्ध गांधींचे भक्त आणि समर्थक किती खंबीरपणे उभे राहिले, याची चर्चा करण्यात अर्थ नाही. कारण त्यानंतर दाेन मिहन्यांतच नथुराम गाेडसेला देशभक्त म्हणणाऱ्या साध्वीला केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाने लाेकसभेची उमेदवारी दिली. त्या आता संसदेत सदस्य म्हणून बसत आहेत. गांधीजींचा राम आणि या साध्वी-संतमहंतांचा जय श्रीराम यात मूलभूत फरक आहे. आज हा फरक ठळक करून गांधीजींच्या नावाचा उदाेउदाे केला जाताे आहे.

गांधीजी आज जगभरात संवादाचे माध्यम आहेत. तरुणांच्या वर्गातही आणि ज्या वर्गाने सतत त्यांच्यावर टीका केली, अशा वंचित मागासवर्गातही गांधींशी संवाद सुरू झाला आहे. आपण सगळेच जयंती, पुण्यितथी जाेरदार साजरी करण्याच्या प्रवृत्तीचे लाेक आहोत. त्यामुळे गांधीजींच्या नावाचा गजर आपण जेवढा करू त्यापेक्षाही शतपटीने माेठा गजर आता वरकरणी गांधींना स्वीकारणारे सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक करणार आहेत.

अशा वेळी रवींद्रनाथ टागाेरांचे स्मरण होते. ते गांधीजींचा वाढिदवस शांतीनिकेतनमध्ये साजरा करायचे आणि त्यानिमित्ताने गांधींच्या गुणांचे, त्यांच्या कार्याचे जाहीर मंथन करायचे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की पुणे कराराच्या काळात गांधींचे उपाेषण संपत असताना टागाेर त्यांना भेटायला पुण्यात आले होते आणि जाहीर सभेतही सहभागी झाले होते. हे अशासाठी सांगताे आहे की, लुई फिशर यांच्या या नितांत सुंदर ग्रंथाचा अनुवाद करून जाेगळेकर यांनी आणि साधना प्रकाशनाने अशा नव्या विचारमंथनासाठी आपल्याला अवकाश उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.

अरुण खोरे, हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

‘महात्मा गांधी : हिज लाईफ अ‍ॅण्ड टाइम्स’
मूळ लेखक – लुई फिशर
महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ
अनुवाद – वि. रा. जोगळेकर
साधना प्रकाशन
किंमत – ७०० रुपये 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: