महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर

महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंक

अर्थमंत्र्यांनी लपवली आकडेवारी
२०१९ अर्थसंकल्प : एक बाण, लक्ष्य अनेक
कोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल पवार यांनी गुरुवारी विधानसभेत मांडला होता. राज्याची महसुली तूट २० हजार २९३ कोटींनी वाढल्याचे आणि दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचे त्यात स्पष्ट झाले. राज्यावर एकूण ४ लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यात स्पष्ट झाले.

अर्थसंकल्पातील मुद्दे

–  १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार २०१९-२० या वित्तीय वर्षात केंद्राकडून राज्याला मिळणारी रक्कम कमी करण्यात आली आहे.

– केंद्राकडून वस्तू व सेवा (जीएसटी) कराची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने राज्याची विकासकामे रखडली.

– सरकारने शेतकऱ्यांना सुटसुटीत कर्जमाफी दिली असून, यामध्ये सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी.

– ऊसाची शेती पूर्णपणे ठिबक सिंचनाखाली आणणे हे राज्याचे लक्ष.

– शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसविण्याची योजना.

– पुण्यासाठी प्रस्तावित रिंग रोड चार वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न. त्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या नितीन गडकरी यांच्या बैठकीत केंद्राने १२०० कोटी रुपये देण्याचे मान्य झाले आहे.

– पुणे मेट्रोसाठी या वर्षात अधिक निधी.

– औद्योगिक वापरातील वीज दरातही कपात.

– आमदार निधी आता २ ऐवजी ३ कोटी.

– उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून सवलती.

– प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे.

– स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी सरकार कायदा करणार आणि मुख्यमंत्री रोजगार योजना राबविणार.

– महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मराठी शाळा चालविण्यास प्रोत्साहन.

– वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा वाढवून नवीन महाविद्यालये सुरू करणार.

– एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बस बदलून नवीन बस आणणार. सर्व गाड्यांमध्ये वायफाय सुविधा.

– सोलापूर आणि पुण्यात नवीन विमानतळासाठी निधीची तरतूद.

– ग्रामीण भागातील ४० हजार किमीची रस्त्याची कामे करणार.

– मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, पहिल्या टप्प्यात उजनी आणि जायकवाडीचं पाणी देणार त्यासाठी तरतूद.

– नाट्यसंमेलनासाठी १० कोटी रुपये, तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद.

– सॅनिटरी नॅपकीनच्या नवीन मशीनसाठी अनुदानित नॅपकिनसाठी १५० कोटींची तरतूद.

– महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांची संख्या ४९३ वरून १ हजार करणार.

– शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहन देऊन पाच वर्षात १० लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न.

– तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्यासाठी ५ कोटींचा निधी अर्थसंकल्पातून प्रस्तावित करण्यात आला.

– महर्षी धोंडो केशव कर्वे, पां.वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आचार्य विनोबा भावे या भारतरत्नांचे एकत्रित स्मारक, माजी मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांचे स्मारक, माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे स्मृतीभवन, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील, लोकनेते कै.बाळासाहेब देसाई यांचे पाटण, जिल्हा सातारा येथील शताब्दी स्मारक, मंगळवेढ्यातील संत चोखामेळा आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक, कोल्हापूर येथील शाहू मिलमध्ये शाहू महाराजांचे स्मारक, स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे यांचे मौजे वासाळी, जिल्हा नाशिक येथील स्मारक, राजगुरू नगर येथील हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

– महात्मा गांधी यांचे विचार व तत्वे यांचा प्रसार करण्यासाठी गांधीजींच्या वास्तव्याने पावन झालेल्या मणीभवन या वास्तुचे नुतनीकरण करण्यासाठी या आर्थिक वर्षासाठी रुपये २५ कोटी इतका निधी प्रस्तावित आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेचे हीरकमहोत्सवी वर्ष असून विविध कार्यक्रमाद्वारे हे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. त्यासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला रुपये १२ कोटी देण्याचे प्रस्तावित.

– पुण्यात नोकरी करणाऱ्या महीलांसाठी १००० क्षमतेचे वसतीगृह, मुंबई व पुणे विद्यापिठात ५०० निवासी क्षमतेची वसतीगृहे राज्य शासनाच्या विचाराधीन.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0