मणिपूरमध्ये भाजपचे सरकार अल्पमतात

मणिपूरमध्ये भाजपचे सरकार अल्पमतात

इंफाळः मणिपूरमध्ये भाजपप्रणित आघाडी सरकारचा ९ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्ष काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष वाय. खेमचंद यांच्या

शिव्यांची नवी राजकीय संस्कृती
चेंजमेकर ‘ नंदीग्राम’
हलाल मांसावर बंदी हवीः भाजप आमदाराची मागणी

इंफाळः मणिपूरमध्ये भाजपप्रणित आघाडी सरकारचा ९ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्ष काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष वाय. खेमचंद यांच्या निलंबनासाठी नोटीस दिली असून काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसचे आमदार के. मेघाचंद्र यांनी घटनेतील १७९(सी) अन्वये विधानसभा अध्यक्षांच्या निलंबनाची नोटीस दाखल केली आहे.

मेघचंद्रा यांनी १० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. पाठिंबा देणार्यांमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे व सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंह यांच्यासह  एन. कायशी, लेतपाओ हाओकिप, एल. जयंत कुमार असून या मंत्र्याचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारचा पाठिंबा काढून घेणार्यांमधील ७ आमदार हे पूर्वीचे काँग्रेसचे आमदार असून ते भाजपकडे गेले होते. पण त्यांच्याविरोधात पक्षांतरबंदी कारवाई प्रलंबित होती.

तर तृणमूल काँग्रेस व दोन अपक्ष आमदारांनीही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.

या आमदारांच्या राजीनामा नाट्याने ६० जागांच्या विधानसभेमध्ये आता विरोधकांकडे २९ आमदार असून त्यातील २० आमदार काँग्रेसचे, ४ नॅशनल पीपल्स पार्टीचे व ३ भाजपचे, (ज्यांनी बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली) एक तृणमूलचा व एक अपक्ष आमदार आहेत.

तर सरकारचे संख्याबळ २३ झाले आहे. यामध्ये भाजपचे १८, नागा पीपल्स फ्रंटचे ४ व एलजेपीच्या एका आमदाराचा समावेश आहे.

काँग्रेसचा एक आमदार पूर्वी भाजपमध्ये सामील झाला होता. पण त्यांची आमदारकी रद्द झाल्याने मणिपूर विधानसभेचे संख्याबळ एकने कमी होऊन ५९ झाले होते.

मणिपूरमध्ये २०१७मध्ये निवडणुका झाल्या होत्या. यात काँग्रेसला अधिक जागा मिळूनही भाजपने काँग्रेसच्या आमदारांना फोडून सत्ता स्थापन केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0