विधाने जपून कराः डॉ. मनमोहन सिंग

विधाने जपून कराः डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्लीः लडाखमधील भारत-चीन सीमावाद संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर सोमवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ट

चीन, ‘डब्ल्यूएचओ’ आणि तैवान – भाग १
चीन-भारत तणाव चिघळला, २० जवान शहीद
तैवानी तिढा

नवी दिल्लीः लडाखमधील भारत-चीन सीमावाद संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर सोमवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी टीका केली आहे. लडाखमधील चीनचे सैन्य घुसले नव्हते असे मोदींनी विधान केल्याने चीनच्या षडयंत्राला मदत करण्यासारखे होते, पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्यांबाबत सावध असले पाहिजे व सरकारच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या अशा आव्हानाचा सामना केला पाहिजे, असे त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करून म्हटले आहे.

भ्रम निर्माण करणारा प्रचार हा राजकीय कुटनीतीला किंवा मजबूत नेतृत्वाला पर्याय देत नसतो असा टोला हाणत भारताच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, असेही डॉ. मनमोहन सिंग यांनी सुनावले. १५-१६ जूनमध्ये जे २० जवान गलवान खोर्यात शहीद झाले, त्या साहसी जवानांचे बलिदान व त्यांच्या कुटुंबियांविषयी आपण सर्व कृतज्ञ राहू व त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. आज इतिहासात अत्यंत नाजूक वळणार आपण उभे आहोत, आपले सरकार या क्षणी जी पावले उचलेल त्यांचे आकलन आपल्या भविष्यातील पिढ्या करतील. पंतप्रधानांनी देशाचे संरक्षण व सामरिक हितांसाठी जी विधाने केली जातील, त्यावर सतर्क राहिले पाहिजे, असेही डॉ. मनमोहनसिंग म्हणाले.

राहुल गांधी यांची मोदींवर पुन्हा टीका

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनसंदर्भातील लेच्यापेच्या भूमिकेवर ‘सरेंडर’ मोदी असे म्हटल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा मोदींवर टीका करत चीनचा मीडिया तुमची का प्रशंसा करत आहे, असा सवाल उपस्थित केला. राहुल गांधी यांनी एका बातमीचा हवाला ट्विटरवर देत चीनने आमचे जवान मारले. चीनने आमची जमीन गिळंकृत केली पण चीन या वादात मोदींची का तारीफ करत आहे, असा सवाल उपस्थित केला.

चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली नाही, असे विधान मोदींनी केले होते. भारताच्या या भूमिकेचे चीनने कौतुक केले आहे. परिस्थिती निवळण्यास भारताची भूमिका मदत करेल असे चीनच्या मीडियाचे म्हणणे आहे.

भाजप अध्यक्षांची टीका

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान मोदींवरच्या टीकेनंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसच्या काळात भारताचा सुमारे ४३ हजार किमी.चा प्रदेश चीनने बळकावला असून यूपीए सरकारच्या काळात चीनने ६०० हून अधिक वेळा घुसखोरी केल्याचा आरोप केला. या आरोपावर काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विटवरून शहीद भारतीय जवानांचा व भारतीय लष्कराचा अवमान करू नका असे प्रत्युत्तर दिले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0