जालियनवाला बाग नूतनीकरणः इतिहासकाराकडून निषेध

जालियनवाला बाग नूतनीकरणः इतिहासकाराकडून निषेध

नवी दिल्लीः पंजाबमधील जालियनवाला बाग परिसराच्या नूतनीकरणात मोदी सरकारने खरा इतिहास पुसून टाकल्याचा निषेध देशातील इतिहासकार, काँग्रेससह अन्य विरोधी पक्

निवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार
इंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र
द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती

नवी दिल्लीः पंजाबमधील जालियनवाला बाग परिसराच्या नूतनीकरणात मोदी सरकारने खरा इतिहास पुसून टाकल्याचा निषेध देशातील इतिहासकार, काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केला आहे.

१३ एप्रिल १९३३मध्ये काळा कायदा म्हणून ओळखल्या जाणार्या रौलेट कायद्याच्या विरोधात अमृतसरस्थित जालियनवाला बागेत देशव्यापी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतल्या उपस्थित शेकडो भारतीय नागरिकांवर ब्रिटीश जनरल डायरने गोळीबार करावा असे आदेश आपल्या सहकार्यांना दिले होते. त्यानंतर बेछुट गोळीबारात १ हजारहून अधिक जण ठार झाले होते.

डायरने गोळीबाराचे आदेश देण्याअगोदर जालियानवाला बागेच्या सभोवताली सैनिक उभे केले. बाहेर जाण्याच्या सर्व वाटा बंद केल्या व उपस्थित सभेवर गोळीबार केला. या गोळीबारानंतर मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली, शेकडो माणसे या बागेच्या एका अरुंद बोळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. बागेतल्या एका विहिरीत शेकडोंनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या होत्या. तरीही पोलिसांनी गोळीबार थांबवला नव्हता.

जालियनवाला बागेच्या भिंतीमध्ये आजपर्यंत गोळ्यांच्या खुणा दिसत होत्या. ब्रिटीश सत्तेच्या हे दमनकारी रुप जगाला कळावे व देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक काळा कुट्ट इतिहास अनेक पिढ्यांना कळावा म्हणून ही जागा जैसे थे स्वरुपात जतन करून ठेवण्यात आली होती. पण मोदी सरकारने नूतनीकरणाच्या नावाखाली जालियनवाला बागेतील अरुंद बोळांचा कायापालट केला. बोळांच्या फरशांचे नूतनीकरण केले. भिंतींवरचे रुप पालटून टाकले. पुतळ्यांवर पक्षी बसू नये म्हणून त्या झाकल्या आहेत. बागेतील मोक्ष स्थल, अमर ज्योती व ध्वज मस्तूल यांचेही नूतनीकरण करण्यात आले. बागेतील केंद्रस्थानी असलेले ज्वाला स्मारक पुन्हा नव्याने बांधले. बागेतील लिली तलाव विकसित केला आहे. तेथे पर्यटक येऊ-जाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

इतिहासकार, काँग्रेस नेत्यांची टीका

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट घटना समजली जाणारी जालियनवाला बाग हत्याकांड घटनाच मोदी सरकारने पुसून टाकली आहे, अशी टीका विविध स्तरातून केली जात आहे.

प्रख्यात इतिहासकार एस. इरफान हबीब यांनी सरकारचे हे काम म्हणजे स्मारकांचे खासगीकरणाचा मार्ग असून आधुनिक संरचनाच्या नावाखाली ऐतिहासिक संदर्भ असलेल्या वास्तूंचे ऐतिहासिक मूल्य पुसून टाकण्याचा व इतिहासातील घटनांची मोडतोड करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.

माकप नेते सीताराम येचुरी यांनी जालियनवाला बागेचे नूतनीकरण हा शहीदांचा अपमान असून जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला वेग आला होता. या जागेतील प्रत्येक वीट ही इंग्रजांच्या काळ्या राजवटीची साक्षीदार आहे. जे स्वातंत्र्य चळवळीपासून दूर होते, तेच असे काम करू शकतात, अशी टीका केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही जालियनवाला बागेच्या नूतनीकरणावरही टीका केली. ज्यांना देशासाठी शहीद होण्याचा अर्थच कळत नाहीत त्यांनीच शहीदांचा अपमान करण्याचे हे काम केले आहे. मी एका शहीदाचा मुलगा आहे, असा अवमान कोणतीही किंमत देऊन मी सहन करू शकत नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.

(वृत्त छायाचित्र – मोदी सरकारने नूतनीकरणाच्या नावाखाली जालियनवाला बागेतील अरुंद बोळांचा कायापालट केला. बोळांच्या फरशांचे नूतनीकरण केले. )

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: