तेलगळतीमुळे मॉरिशसमध्ये पर्यावरण आणीबाणी

तेलगळतीमुळे मॉरिशसमध्ये पर्यावरण आणीबाणी

एका जपानी तेलवाहू जहाजातून तेलगळती झाल्यानंतर मॉरिशस बेटांवर पर्यावरण आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ही दुर्घटना गेल्या शुक्रवारी घडली. जपानची कंपन

भारतात बनावट ‘एन-95’ मास्कचा सुळसुळाट
म्युकरमायकोसिसवरचे उपचार म. फुले योजनेतून होणार
मालेगाव राज्यातील कोरोनाचे ‘ब्लॅक स्पॉट’ !

एका जपानी तेलवाहू जहाजातून तेलगळती झाल्यानंतर मॉरिशस बेटांवर पर्यावरण आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ही दुर्घटना गेल्या शुक्रवारी घडली.

जपानची कंपनी ओकियो मेरिटाइम कॉर्पोरेशन व नागाशिकी शिपिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे हे जहाज असून ते सिंगापूरहून ब्राझील जात होते. या जहाजात ४ हजार टन तेल होते व २५ जुलैला ते मॉरिशसच्या बेटांजवळ थांबले होते. या जहाजातून तेलगळती सुरू झाल्याने परिस्थिती गंभीर झाली. मॉरिशसच्या बेटांवर सुमारे १० लाखाहून अधिक लोक राहात आहेत.

शनिवारी जहाजातून होणार्या तेलगळतीवर नियंत्रण व ते जहाज पुन्हा दुरुस्त करण्याचे तंत्रज्ञान व यंत्रणा मॉरिशसकडे नसल्याने या देशाचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. फ्रान्सकडे मागणी करण्यामागचे कारण, मॉरिशस नजीकची फ्रान्सच्या ताब्यात काही बेटे असून तेथे जहाज दुरुस्तीचे तंत्रज्ञान आहे. मॉरिशसने आपले पोलिस घटनास्थळी तैनात केले आहे, जहाजातून तेलगळती कशी झाली याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, मॉरिशस बेटांच्या पर्यावरणाला तेलगळतीचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती ग्रीनपीस आफ्रिका या संस्थेने व्यक्त केली आहे. मॉरिशसच्या बेटांवर व समुद्रात हजारो सागरी जीव असून त्यांना तेलगळतीमुळे झालेल्या प्रदूषणाचा फटका बसू शकतो. त्याचबरोबर तेलगळतीचा मॉरिशसची अर्थव्यवस्था, अन्नसुरक्षा व आरोग्यालाही धोका पोहचला आहे, असे ग्रीनपीस आफ्रिकेचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: