अल जझिराची पत्रकार इस्रायल सैनिकांच्या कारवाईत ठार

अल जझिराची पत्रकार इस्रायल सैनिकांच्या कारवाईत ठार

जेनीन, वेस्ट बँकः अल जझिरा या वृत्तसमुहाची पत्रकार शिरीन अबू अकलेह (५१) इस्रायल सैन्याने केलेल्या एका कारवाईत ठार झाली. अल जझिराने शिरीनच्या मृत्यूला

सर्वोच्च न्यायालय अवमानप्रकरणी भूषण यांना १ रु.चा दंड
मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन
कोरोनाचा हवेतून संसर्गः लॅन्सेटचा अहवाल

जेनीन, वेस्ट बँकः अल जझिरा या वृत्तसमुहाची पत्रकार शिरीन अबू अकलेह (५१) इस्रायल सैन्याने केलेल्या एका कारवाईत ठार झाली. अल जझिराने शिरीनच्या मृत्यूला इस्रायलचे सैनिक जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. शिरीन ही पॅलेस्टाइन-अमेरिकन वंशाची असून ती अल जझिरासाठी जेनिन या शहरातून वृत्तांकन करत होती.

गेले काही दिवस इस्रायल व पॅलेस्टाइन दरम्यान सुरू असलेल्या हिंसाचारात अनेक पॅलेस्टाइन नागरिक मारले गेले आहेत. शिरीन या चकमकीचे वृत्तांकनासाठी जेनिन शहरात आली होती. वृत्तांकन करताना शिरीनने अंगावर ती पत्रकार असल्याचे जाकीट घातले होते. तरीही इस्रायलच्या सैनिकांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या असे अल जझिराचे म्हणणे आहे. शिरीन सोबत असलेल्या तिच्या सहकाऱ्यानेही अली मुडीने इस्रायल शिरीनच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. आमच्या पुढे इस्रायलचे सैनिक आले आणि त्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता आमच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शिरीनला तर दुसरी मला लागली असे मुडीचे म्हणणे आहे.

शिरीनच्या मृत्यूने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली असून इस्रायल सरकारने मात्र शिरीनचा मृत्यू पॅलेस्टाइनकडून करण्यात आलेल्या गोळीबारात झाल्याचे म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नाफतेली बेनेट यांनी काही शस्त्रास्त्रधारी पॅलेस्टाइन बंडखोरांनी शिरीनवर गोळ्या चालवल्या असा दावा केला आहे. इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने शिरीन ही पॅलेस्टाइन बंडखोरांच्या जवळ होती, हे बंडखोर इस्रायलच्या सैन्यावर बेछुट गोळीबार करत होते असे वक्तव्य केले.

पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्र्यांनी इस्रायलला या घटनेसाठी जबाबदार धरले असून शिरीनला इस्पितळात आणले तेव्हा तिच्या डोक्यात गोळ्या मारल्याचे दिसून आले. पॅलेस्टाइनचे पंतप्रधान महमूद अब्बास यांनीही इस्रायलकडून खूनशीपणा झाल्याची टीका केली आहे.

शिरीन गेली दोन दशके इस्रायल – पॅलेस्टाइन संघर्षाचे वृत्तांकन करत होती. तिच्या मृत्यूबाबत अमेरिकेनेही दुःख व्यक्त केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0