वैद्यकीय पदवी परीक्षा १० जूनपासून होणार

वैद्यकीय पदवी परीक्षा १० जूनपासून होणार

मुंबईः राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या २ जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० जून ते ३० जून २०२१या दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यक

अभ्यासक्रमात वैदिक गणिताच्या समावेशाचा प्रस्ताव
अनवट मार्गावरले शिक्षण
केरळ केंद्रीय विद्यापीठाचा ‘राष्ट्रवादी’ फतवा!

मुंबईः राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या २ जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० जून ते ३० जून २०२१या दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी दिली.

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या  परीक्षा संदर्भात  बुधवारी मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक चर्चेस उपस्थित होते.

या परीक्षांमध्ये एमबीबीएस, बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.पी.टी.एच., बी.ओ.टी.एच. आणि बी.एस.सी.नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.

या वैद्यकीय पदवी  परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: