वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये

लातूर:  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आह

भारतीय कॉलेज कॅम्पसेस धोक्यात!
गांधी आणि विज्ञान
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

लातूर:  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. त्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. या या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0