राज कपूर यांचे अनोखे वचन

राज कपूर यांचे अनोखे वचन

राज कपूर एका मुलाखतीत दिलीपकुमारना गमतीने म्हणाले होते, "तू ज्या दिवशी लग्न करशील, तेव्हा मी गुडघ्यावर चालत तुझ्या घरी येईन...'

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन
साऊंड ऑफ मेटल
शालीन रजनीगंधा

कौटुंबिक जिव्हाळा

खालसा कॉलेजमध्ये खूप वर्षांनी दिलीपकुमार आणि राज कपूर यांची भेट झाली. दोघांच्याही कुटुंबाचे परस्परांशी पूर्वीपासून चांगले संबंध होते. राज कपूर यांचे आजोबा देवान बसवेश्वरनाथ कपूर यांचे पेशावरमधील दिलीपजींच्या घरी जाणे-येणे असे. मुंबईमध्ये भेट झाल्यापासून दोन्ही कुटुंबाचे परस्पर संबंध कायम सौहार्दाचे आणि आपुलकीचे राहिले. परस्परांशी पेशावरच्या पश्तू भाषेत संवाद साधण्याचे अनोखे सौख्य दोन्ही कुटुंबीयांना मिळत असे.

– – – – – – – – – – – – –

पतंगाचे वेड

लहानपणापासून पतंग उडवण्याचे वेड दिलीपजींना होते. जानेवारी महिना आला की तऱ्हे-तऱ्हेच्या पतंगांनी दुकाने सजत. संध्याकाळी गच्चीवर बेभान होऊन पतंग उडवणाऱ्या मुलांच्या ग्रुपमध्ये युसूफ उत्साहाने सामील असायचा. उंचच उंच पतंग उडवण्याची आणि स्पर्धकाचा पतंग काटण्याची नुसती चढाओढ असायची. पतंगाच्या खेळाचा हा शौक अभिनेता म्हणून नावारूपाला आल्यानंतरही कायम राहिला. गुजरात, राजस्थान, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथील छोट्या शहरांमधून खरेदी केलेल्या सर्वोत्तम पतंगांनी भरलेली एक मोठी ट्रंक दिलीपसाहेबांच्या तळघरात आहे.

– – – – – – – – – – – – –

पहिली कमाई

१९४२ मधील ही घटना. डॉ. मसानी यांनी दिलीपकुमारना नोकरीसाठी म्हणून बॉम्बे टॉकीजमध्ये नेले. जुजबी बातचीत झाल्यानंतर तेथील अधिकारी देविका राणी यांनी जेव्हा दिलीपकुमारना “तू अभिनेता म्हणून आमच्या स्टुडियोमध्ये रुजू होशील का? तुला १२५० रुपये मासिक वेतन मिळेल.’ अशी ऑफर दिली, तेव्हा दिलीपकुमारना सुखद धक्काच बसला. त्यांनी घरी येऊन ही आनंदाची बातमी सांगितली, तेव्हा कोणाचाही विश्वास बसेना. हा वार्षिक पगार असेल, असेच घरच्यांचे म्हणणे होते. कारण त्या वेळी राज कपूर यांना १७० रुपये मासिक वेतन मिळत होते! मी लगेचच डॉ. मसानींकडे जाऊन त्यांना सांगितले, की एवढ्या कमी वार्षिक पगारात मला परवडणार नाही. तेव्हा त्यांनी देविकाराणी यांना फोन केला असता समजले की, हा मासिक पगार आहे!

– – – – – – – – –

राज कपूर यांचे अनोखे वचन

राज कपूर एका मुलाखतीत दिलीपकुमारना गमतीने म्हणाले होते, “तू ज्या दिवशी लग्न करशील, तेव्हा मी गुडघ्यावर चालत तुझ्या घरी येईन…’ राजसाहेबांनी आपले गमतीतले हे वचन प्रत्यक्षातही पाळले. दिलीपकुमार-सायराच्या लग्नाला जेव्हा ते पाली हिलच्या दिलीपकुमारच्या घरी पोहोचले, तेव्हा ते चक्क गुडघ्यावर चालू लागले. उपस्थित मंडळी आश्चर्याने पाहू लागली… दिलीपकुमारची बहीण सकीनाने जेव्हा बाल्कनीतून हा प्रकार पाहिला, तेव्हा तिने धावत जाऊन राज कपूरना थांबवले आणि उभे केले.

– – – – – – –

बाळासाहेबांची संवेदनशीलता

बाळासाहेब ठाकरे आणि दिलीपकुमार यांची ओळख १९६६मध्ये बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले त्याच्या आधीपासूनची. दोघांनाही परस्परांबद्दल तेवढाच आदर. अभिनेता म्हणून दिलीपकुमार बाळासाहेबांचे आवडते आणि दिलीपकुमार बाळासाहेबांच्या थेट आणि मर्मभेदी व्यंगचित्रांचे चाहते. जेव्हा दिलीपकुमार बाळासाहेबांना आणि मीनाताईंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात, तेव्हा परस्परांमधले मतभेद काही क्षणांत विरून जात आणि सर्व बाजूला सारून दोघेही पुन्हा मैत्रीच्या बंधात बांधले जात….

– – – – –

लता मंगेशकरदिलीपजींची धाकटी बहीण

१९४७मध्ये संगीतकार अनिल विश्वास यांनी दिलीपसाहेबांशी लता मंगेशकर यांची आेळख करून दिली.  १९७४मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमधील कार्यक्रमात दिलीपजींनी उपस्थितांना “माझी छोटी बहीण’ अशी लताजींची ओळख करून दिली होती. तेव्हापासून दोघांनी प्रेमाने हे नाते जपले. २६ जानेवारी १९६३ रोजीच्या दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात १९६२च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांना लताजींनी आपल्या सुरांनी श्रद्धांजली वाहिली.  त्या वेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार असल्याचा सार्थ अभिमान दिलीपजींना होता. लताजी नेहमी दिलीपजींच्या घरी जाऊन त्यांना सरप्राइज देत आणि जेव्हा दिलीपसाहेब परवानगी देतील तेव्हाच एखाद्या आज्ञाधारक लहान बहिणीप्रमाणे तिथून निघत. त्यांच्या दिलखुलास गप्पांमध्ये ते बॉम्बे टॉकीज आणि मेहबूब स्टुडियोतल्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देत असत…

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0