लॉकडाऊनच्या काळात १ कोटी श्रमिकांचे स्थलांतर

लॉकडाऊनच्या काळात १ कोटी श्रमिकांचे स्थलांतर

नवी दिल्लीः कोविड-१९च्या महासाथीमुळे पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात सुमारे १ कोटी १४ लाख स्थलांतरित आपापल्या गावी परतल्याची माहिती कामगार व रोजगार खात्

मुनव्वर फारुकीचा शो रद्द करण्याची बजरंग दलाची मागणी
‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’
बिहारः एनडीएचा पूर्ण बहुमत मिळाल्याचा दावा

नवी दिल्लीः कोविड-१९च्या महासाथीमुळे पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात सुमारे १ कोटी १४ लाख स्थलांतरित आपापल्या गावी परतल्याची माहिती कामगार व रोजगार खात्याचे मंत्री संतोष गंगवार यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. या स्थलांतरितांपैकी बहुतांश आता आपापल्या रोजगाराच्या ठिकाणी परतल्याचेही त्यांनी सांगितले.

उ. प्रदेश, बिहार, प. बंगाल व राजस्थान या राज्यातील मजुरांची सर्वाधिक स्थलांतर झाले तर लडाख, लक्षद्विप व हरयाणा येथे अत्यंत कमी स्थलांतरण झाले. गुजरातची आकडेवारी मिळालेली नाही, असे गंगवार यांनी सांगितले.

स्थलांतरितांच्या मृत्यूची आकडेवारी नाही

राज्यसभेतल्या प्रश्नोत्तराच्या काळात सरकारने पुन्हा आपल्याकडे लॉकडाऊनच्या काळात मरण पावलेल्या स्थलांतरितांची आकडेवारी नसल्याचे सांगितले. आसाम, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, मेघालय, हिमाचल प्रदेश, पंजाब, केरळ, नागालँड, मणिपूर, अंदमान व निकोबार बेटे या ठिकाणाहून एकाही स्थलांतरिताच्या मृत्यूची माहिती मिळाली नाही, महाराष्ट्रात मात्र १७ स्थलांतरित मजुरांचे मृत्यू झाले. तेही औरंगाबाद येथे रेल्वे दुर्घटनेत झाले. जेव्हा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची माहिती मिळेल तेव्हा ती पटलावर ठेवण्यात येईल, असे गंगवार यांनी सांगितले.

अन्य स्रोतांची वेगळी माहिती

१४ मार्च २०२० ते ४ जून २०२० या कालावधीत लाखो मजुरांनी आपापल्या गावाकडे धाव घेतली. या प्रवासात कमीत कमी ९०६ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारेतर स्रोतांची होती. यात मरण पावलेले सर्वच स्थलांतरीत मजूर नव्हते. काहींचे मृत्यू उपासमारीने तर काहींचे अतिश्रमाने झाले होते.

सरकारने देशभरात ४० कोटी कामगार असंघटित क्षेत्रात कार्यरत असल्याचीही माहिती एका प्रश्नावर दिली.

लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांना घरी सोडण्यासाठी रेल्वेने ४,६११ श्रमिक ट्रेन सोडल्या. त्यातून ६३ लाख श्रमिक आपापल्या घरी गेले अशीही माहिती सरकारने दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0