स्थलांतरितांसाठीच्या हजार बस काँग्रेसने माघारी बोलावल्या

स्थलांतरितांसाठीच्या हजार बस काँग्रेसने माघारी बोलावल्या

लखनौ : बाहेरच्या राज्यातले हजारो स्थलांतरितांना घरी जाता यावे म्हणून त्यांच्यासाठी हजार बससेवा उपलब्ध करून देण्याच्या काँग्रेसच्या मदतीकडे उ. प्रदेशचे

काँग्रेसची सूत्रे सध्या सोनियांकडेच
उत्तर प्रदेशात काँग्रेसने दिला सामाजिक चौकटींना छेद!
गेहलोत सरकारने बहुमत सिद्ध करावेः भाजप

लखनौ : बाहेरच्या राज्यातले हजारो स्थलांतरितांना घरी जाता यावे म्हणून त्यांच्यासाठी हजार बससेवा उपलब्ध करून देण्याच्या काँग्रेसच्या मदतीकडे उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे उ. प्रदेशच्या सीमांवर थांबलेल्या सर्व बस काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी माघारी बोलावल्या.

बुधवारी दिवसभर काँग्रेसच्या मदतीवरून अडवणुकीचे प्रयत्न उ. प्रदेश प्रशासनाकडून करण्यात आले. प्रियंका गांधी यांनी सर्व बस उ. प्रदेशच्या सीमेवर उभ्या असून त्यांना राज्यात प्रवेशाची परवानगी द्यावी. अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरितांना त्यांच्या घरी जाऊ द्यावे, त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे, त्यात कोणतेही राजकारण वा अडचणी आणू नये, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले.

काँग्रेसने बुधवारी गाजियाबाद सीमेवर ५०० बस उभ्या केल्या होत्या. तर मंगळवारी ९०० बस राजस्थान-उ. प्रदेश सीमा व गाजियाबाद-दिल्ली-उ. प्रदेश सीमेवर उभ्या केल्या होत्या. या बसेसना उ. प्रदेश प्रशासनाने राज्यप्रवेश दिला असता तर ९२ हजाराहून अधिक स्थलांतरित आपल्या घरी गेले असते असे काँग्रेसचे म्हणणे होते.

काँग्रेस-उ. प्रदेश सरकारमध्ये जुंपली

सोमवारी बाहेरच्या राज्यातले हजारो स्थलांतरित उ. प्रदेशाच्या सीमेवर पोहचल्यानंतर त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी काँग्रेसने हजार बस तैनात केल्या होत्या. पण उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिले ही मदत नाकारली होती पण नंतर त्यांनी होकार दिला होता. पण प्रत्यक्षात प्रशासनाकडून काँग्रेसची अडवणूक सुरू करण्यास सुरवात केली.

काँग्रेसने आपल्या मदतीमागे, लॉकडाऊनमुळे पूर्ण रोजगार गेल्याने व खाण्यापिण्याचे संकट वाढल्याने लाखो स्थलांतरित उ. प्रदेशात आपापल्या गावी चालत परतत आहेत. तर काही हजारो स्थलांतरित विविध राज्यातून उ. प्रदेशाच्या सीमेवर पोहचले आहेत. या स्थलांतरितांना त्यांच्या घरी जाता यावे यासाठी १००० बसेसची सोय करत असल्याची भूमिका स्पष्ट केली होती व त्याचा खर्च पक्ष उचलेल असेही जाहीर केले होते.

काँग्रेसने देऊ केलेली ही मदत उ. प्रदेश सरकारने स्वीकारली पण काँग्रेसने दिलेल्या १००० बसची यादी पाठवण्यास सांगितले. जेव्हा ही यादी पाठवण्यात आली तेव्हा उ. प्रदेश सरकारने बसच्या यादीत बसशिवाय काही दुचाकी वाहने, रुग्णवाहिका, कार असल्याचा दावा केला.

यावर काँग्रेसने असे उत्तर दिले की, उ. प्रदेश सरकारने ८७९ बस असल्याची पुष्टी केली होती, त्यामुळे त्या बसना किमान राज्यात प्रवेश करू द्यावा.

पण उ. प्रदेश प्रशासनाने हे म्हणणे धुडकावून लावल्यानंतर सरकारच्या या अडवणुकीवर काँग्रेसने आक्षेप घेतला. सध्या मजूरांची समस्या गंभीर असून गाड्यांची कागदपत्रे सरकारला महत्त्वाची वाटतात की मजुरांचे जीव, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.

खोटी माहिती दिली म्हणून काँग्रेस नेत्यांवर गुन्हे

उ. प्रदेशच्या सरकारने अन्य वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी ३० जूनपर्यंत पुढे ढकलली होती. पण आता काँग्रेसनेच पाठवलेल्या वाहनांची का कसून चौकशी केली जात आहे, असा सवाल काँग्रेसकडून केला गेला.

दरम्यान काँग्रेसच्या मदतीमध्ये अडचणी आणण्याच्या हेतूने उ. प्रशासनातील परिवहन खात्याने बसची चुकीची यादी दिल्याबद्दल काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सेक्रेटरी संदीप सिंह, उ. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू व अन्य काही पदाधिकार्यांच्याविरोधात फिर्यादी दाखल केल्या.

यावर काँग्रेसने उ. प्रदेश परिवहन खात्याच्या ३० जूनपर्यंत सवलती देण्याच्या आदेशाकडे सरकारचे लक्ष वेधले व बसेसना उ. प्रदेश राज्यात प्रवेश देण्याविषयी दोन पत्रे लिहिली असल्याचेही सांगितले. पण सरकारने यावर मौन राखले.

दरम्यान, उ. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू व त्यांचे पदाधिकारी ७०० बस घेऊन नागला या ठिकाणी उपस्थित झाले होते पण त्यांना आग्र्यात प्रवेश करण्यास प्रशासन परवानगी दिला गेला नाही.

महत्त्वाचे म्हणजे सोमवारीच बसेसना परवानगी देण्यात आली होती पण प्रत्यक्षात सर्व सीमांवर बस रोखून धरल्या होत्या.

या वादाचे पर्यवसान पोलिस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली आणि पोलिसांनी अजय कुमार लल्लू व प्रदीप माथूर, विवेक बन्सल या नेत्यांना ताब्यात घेतले आणि या सर्व नेत्यांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप दाखल करण्यात आला.

राजस्थानमधून ७०० बस

काँग्रेसने स्थलांतरितांसाठी राजस्थानमधून ७०० बस आणल्या होत्या त्या गाझियाबाद व नोएडा येथून सुटणार होत्या. पण आता परवानगी न मिळाल्याने या बस पुन्हा पाठवण्यात आल्या आहेत.

वास्तविक सोमवारी रात्री ११.४० मिनिटांनी प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संदीप सिंह यांना उ. प्रदेश प्रशासनाकडून एक इमेल आला होता. या इमेलमध्ये काँग्रेसने मंगळवारी सकाळी १० वाजता लखनौमध्ये बस पाठवून द्याव्यात असे सांगण्यात आले होते.

यावर काँग्रेसने असे उत्तर दिले की, हजारो श्रमिक उ. प्रदेशच्या सीमेवर थांबले आहेत आणि अशा परिस्थितीत रिकाम्या बस लखनौला पाठवणे हे अमानवीय असून ते गरीबविरोधी मानसिकता दर्शवणारा निर्णय आहे. असा आदेश देऊन उ. प्रदेशचे सरकार राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

यावर उ. प्रदेशचे अप्पर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी असे उत्तर दिले की, बसेसना सीमेवर आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण १९ मे रोजी आपण (काँग्रेस) जे पत्र लिहिले होते या पत्रात आपण लखनौमध्ये बस आणू शकत नाही याबद्दल असमर्थता दाखवली होती आणि आता आपण बस गाजियाबाद व नोएडात आणू पाहता आहात.

अवस्थी यांनी काँग्रेसला कौशाम्बी व साहिबाबाद बस स्थानकावर ५०० बस आणण्यास सांगितले होते व तेथे गाजियाबादचे जिल्हाधिकारी या बसेस आपल्या ताब्यात घेतील असे सांगितले होते. प्रत्यक्षात असे काही घडलेच नाही.

राजकीय चिखलफेक

उ. प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. या पक्षाने बसच्या यादीत ऑटो रिक्षा, मोटार सायकलचे क्रमांक समाविष्ट करून सरकारला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. बसच्या यादीतही काँग्रेस घोटाळा करत असल्याचे ते म्हणाले. त्याला अनुमोदन देत कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनीही प्रियंका वाड्रा, राहुल गांधी यांची काँग्रेस पार्टी बनावट पार्टी असल्याचा आरोप केला. या दोघांची आई सोनिया गांधी, ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी या प्रकरणात आपली बनावट पार्टी काय करत आहे, यावर खुलासा केला पाहिजे, असे वक्तव्य केले.

दरम्यान, मंगळवारी प्रियंका गांधी यांनी ट्विटवरवरून उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ यांनी विनंती केली की, ‘या बसवर भाजपचे झेंडे, पोष्टर लावले तरी चालतील पण आमच्या मदतीला त्यांनी धुडकावून लावू नये. गेले तीन दिवस या राजकारणात व्यर्थ गेले आहेत व या काळात आपल्या देशाचे नागरिक पायपीट करत दमून मरत आहेत.’

त्या असेही म्हणाल्या की, ‘काँग्रेसने पाठवलेल्या १०४९ बसपैकी ८७९ बसची तपासणी झाली आहे आणि यात या बस योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. आमच्या ५०० बसेसना राजस्थान नागला सीमेवर रोखून धरले आहे, तर दिल्ली बॉर्डरवर ३००हून अधिक बस आल्या आहेत. तरी कृपया या ८७९ बसेसना वाहतुकीची परवानगी द्यावी. आम्ही उद्या २०० नव्या बसची यादी देणार आहोत. या बसची यादी आपण खुशाल तपासावी. लोक संकटात सापडले आहेत, त्यांना घरी जायचे आहे, आपण अधिक वेळकाढूपणा करू नये.’

अखेर आदित्य नाथ यांनी कोणताच निर्णय न घेतल्याने काँग्रेसने माघारी बस बोलावल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: