२० एप्रिलनंतर मनरेगा, शेती, मत्स्यपालन, पोल्ट्री उद्योगांना सूट

२० एप्रिलनंतर मनरेगा, शेती, मत्स्यपालन, पोल्ट्री उद्योगांना सूट

३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन असून या काळापर्यंत कोणतीही सार्वजनिक वाहतूक व सार्वजनिक ठिकाणे सुरू करण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे पण सध्या देशाती

वर्षभरात सरकारने काय केले?- सोनियांचा सवाल
कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे महासंकट
कोरोना आणि राजकारण

३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन असून या काळापर्यंत कोणतीही सार्वजनिक वाहतूक व सार्वजनिक ठिकाणे सुरू करण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे पण सध्या देशातील सद्य परिस्थिती पाहता व जीवनावश्यक गोष्टींची कमतरता जनतेला भासू नये म्हणून येत्या २० एप्रिलपासून काही व्यवहार सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना दिलेले आहे.

गृहखात्याने मंजूर केलेल्यांमध्ये सर्व प्रकारची शेती व बागकाम, मत्स्यपालन आणि पोल्ट्री उद्योगांना त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्यास मंजुरी दिली आहे.

जे मजूर मनरेगावर आहेत त्यांना सोशल डिस्टन्सिंग व सुरक्षित उपकरणांच्या साहाय्याने काम करण्यास सांगितले आहे. मनरेगाच्या माध्यमातून सरकारने सिंचन व जल संधारण यांना प्राधान्य दिले आहे.

औषध, वैद्यकीय उपकरण निर्मिती कारखाने व या व्यवसायाला लागणारा कच्चा माल व त्यांचे उद्योग, फूड प्रोसेसिंग उद्योग, आयटी हार्डवेअर कंपन्यांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे.

पण केंद्र सरकारने सर्व आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, मेट्रो, बस, रेल्वे सेवा , विमान सेवा ३ मे पर्यंत स्थगित केल्या आहेत.

३ मे पर्यंत देशातील सर्व शैक्षणिक संस्था, कोचिंग केंद्र, चित्रपटगृहे, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिमखाने, क्रीडांगणे, स्विमिंग पूल, बार या सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील असेही स्पष्ट केले आहे.

३ मेपर्यंत देशातील सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा कार्यक्रमांना बंदी असून सर्व औद्योगिक व वित्तीय व्यवहार, हॉस्पिटॅलिटी सेवा, टॅक्सी, कॅब सेवा बंद ठेवण्यास सांगितले आहेत.

अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांची मर्यादा घालण्यात आली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0