‘मनरेगाकडे  पद्धतशीरपणे दुर्लक्ष’:  भारतातील ख्यातनाम व्यक्तींचे पंतप्रधानांना खुल्या पत्रातून आवाहन

‘मनरेगाकडे  पद्धतशीरपणे दुर्लक्ष’: भारतातील ख्यातनाम व्यक्तींचे पंतप्रधानांना खुल्या पत्रातून आवाहन

‘मनरेगाच्या  सबलीकरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे’ आणि ‘औपचारिकरित्या याचा समावेश सध्या ओढवलेल्या  ग्रामीण आणि कृषी संकट सोडविण्याच्या उपायांमध्ये करावा’ - २५० स्वाक्षरीकर्त्यांचा पंतप्रधानांना आग्रह.

‘जूनचा पगार द्या’ बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांना पत्र
भारतीय लोक पैसा देशाबाहेर का घेऊन जात आहेत?
मोदी सरकार मंदी असल्याचे मानत नाही : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेअंतर्गत ९९% जमा निधी, नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्याच्या ३ महिने आधीच संपल्याने निधीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या ऋण शिल्लक आहे.

सध्याच्या कठीण काळात कष्टकऱ्यांबाबतच्या या चिंताजनक परिस्थितीची दखल भारतातील तब्बल ९० खासदार आणि  १६० ख्यातनाम व्यक्तींनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून घेतली आहे. यामध्ये माजी सरकारी अधिकारी,  अग्रगण्य विकास अर्थशास्त्रज्ञ, प्रमुख कार्यकर्ते आणि शेतकरी  आंदोलनातील नेते यांचा देखील समावेश आहे. पत्रातून त्यांनी मोदींना मनरेगावर आलेल्या या संकटाकडे  तातडीने लक्ष  देण्याचे आवाहन केले आहे.

हे पत्र ३ जानेवारी, २०१९ रोजी झालेल्या एका सभेचे फलित आहे. या पत्रात असे नमूद केले आहे की, “देशाची एकमेव रोजगार हमी योजना पद्धतशीरपणे  कमकुवत करण्यात येत आहे अशी भीती आम्हाला वाटत आहे. त्याच्या निधी वाटपावरील अवैध निर्बंध, रक्कम देण्यास होणारा मोठा विलंब आणि कमी वेतन, यामुळे ही  योजना कमकुवत होत आहे आणि संकटात सापडलेल्या लोकांना त्यांच्या हक्काच्या एका कायदेशीर व्यवस्थेपासून वंचित केले जात आहे.”

या २५० स्वाक्षरीकर्त्यांनी  पत्रातून पंतप्रधानांना आग्रह केला आहे की ‘मनरेगाच्या  सबलीकरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे’ आणि ‘सध्या ओढवलेल्या  ग्रामीण आणि कृषी संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या उपायांमध्ये अधिकृतपणे याचा समावेश करावा.’

जानेवारी ३ पासून, ग्रामीण विकास खात्याला  ७,००० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. ही बाब जरी स्वागतार्ह असली तरी स्वाक्षरीकर्त्यांनी असे नमूद केले आहे की, “देशभरातील लाखो ग्रामीण कामगारांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी राजकीय प्रतिबद्धता म्हणून सर्व पक्षांनी मिळून मनरेगाला संरक्षित आणि मजबूत करणे आवश्यक आहे.”

या स्वाक्षरीकर्त्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय सिंह, जिग्नेश मेवाणी, योगेंद्र यादव, जया बच्चन, हर्ष मांदेर, स्वामी अग्निवेश, अरुंधती रॉय, वजाहत हबीबुल्ला आणि तीस्ता सेटलवाड यांचा समावेश आहे.

संपूर्ण पत्र खाली दिले आहे:

प्रिय श्री. नरेंद्र मोदी,

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या (मनरेगा) समस्यांबाबत आपले लक्ष वेधण्यासाठी सजग नागरिक, कामगार, कार्यकर्ते आणि राजकीय लोकप्रतिनिधींचा समूह म्हणून आम्ही हे पत्र लिहीत आहोत. वाढती बेरोजगारी आणि शेती उत्पन्नातील घट या गोष्टींमुळे सध्या देशभरात ग्रामीण भागात तीव्र संकट निर्माण झाले आहे. या समस्यांचा सामना करण्यासाठी सरकारच्या मदतीला येणारा मनरेगा हा उपाय अनेक निकषांवर योग्य ठरला आहे. ग्रामीण कामगारांचे जीवन, उपजीवीका आणि उत्पन्न यांचे संरक्षण करण्यासाठी मनरेगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे तसेच आर्थिक अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या असुरक्षित समुदायांना देखील मोठा आधार दिला आहे हे अनेक पुराव्यांनिशी दाखवता येते.

आपल्या सरकारने देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी रोजगार निर्मितीची अनेक आश्वासने दिली आहेत. तरीदेखील देशाची एकमेव रोजगार हमी योजना पद्धतशीरपणे कमकुवत करण्यात येत आहे अशी भीती आम्हाला वाटत आहे. त्याच्या निधी वाटपावरील अवैध निर्बंध, रक्कम देण्यास होणारा मोठा विलंब आणि कमी वेतन, यामुळे ही योजना कमकुवत होत आहे आणि संकटात सापडलेल्या लोकांना त्यांच्या हक्काच्या एका कायदेशीर व्यवस्थेपासून वंचित केले जात आहे.

म्हणून आम्ही आपणास आग्रह करत आहोत की, आपल्या सरकारने, ‘मनरेगाच्या सबलीकरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे’ आणि ‘सध्या ओढवलेल्या ग्रामीण आणि कृषी संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या उपायांमध्ये अधिकृतपणे याचा समावेश करावा.’

आम्ही आपणास विनंती करतो की:

१. मागणीची अधिकृतरीत्या नोंद घेणे, दिनांकित पोचपावती देणे आणि या मागणीला न्याय देण्यासाठी पुरेशा नवीन कामांची तरतूद करणे यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावेत.

२. कामाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आणि वेळेवर निधी पुरवला जातो याची खात्री करावी. संसदेत मंजूर केलेली अंदाजपत्रकातील रक्कम ही केवळ एक अंदाज असते आणि तिच्यामुळे निधीवर मर्यादा येत नाही.

३. मनरेगाचे वेतन हे, राज्य सरकारच्या कायदेशीर किमान वेतनपक्षा कमी नसेल याची खात्री करावी.

४. केंद्रीय आणि राज्य सरकारच्या पातळीवर वेतन देण्यास  १५ दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास, ती रक्कम वेगळी मोजली गेली पाहिजे, त्याविषयीची माहिती सर्वांसाठी खुली केली पाहिजे आणि जेवढा विलंब झाला आहे त्याची पूर्ण भरपाई देखील दिली पाहिजे. मनरेगा कायद्या अंतर्गत  सर्व वित्तीय संस्था आणि पेमेंट एजन्सीजना अधिनियमानुसार जबाबदार ठरवले जावे.

५. पेमेन्ट ऑफ वेजेस या कायद्यानुसार विलंबासाठीच्या भरपाईचा दर निश्चित करावा.

६. मागणीची नोंदणी आणि कामासाठीची मजुरी यासंबंधित सर्व आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय बंधने दूर करणे आवश्यक आहे.

७. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक सार्वजनिक श्रमाधारित काम नेहमीच सुरू असले  पाहिजे.

८. मनरेगाच्या अंमलबजावणी संबंधित सर्व माहिती वेबसाइटवर तसेच ऑफलाइन सार्वजनिकपणे उपलब्ध केली जाणे आवश्यक आहे. व्यवस्थापन माहिती प्रणालीने कायद्यातील तरतुदींचे पालन केले पाहिजे.

९. सर्व दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये मनरेगाचा कायदेशीर कालावधी  २०० दिवसांपर्यंत वाढवावा.

सर्व राजकीय पक्षांद्वारे संसदेत सर्वसमावेशक सहमतीने बनविलेल्या या कायद्याचे  आणि ग्रामीण गरिबांच्या हिताचे विशेषकरून अशा गंभीर संकटाच्या वेळी संरक्षण करणे  हे आपले  कर्तव्य आहे. उपरोक्त सर्व शिफारसी पूर्णपणे कायद्याच्या हेतूशी निष्ठा राखणाऱ्या आहेत. आम्ही आपणास त्वरित, संवेदनशीलतेने आणि वेळेवर कारवाई करण्याचे आणि देशभरातील लाखो ग्रामीण कामगारांच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करण्याची सशक्त राजकीय इच्छा दर्शविण्याचे आवाहन करीत आहोत.

 

आपले विश्वासू,

१. करण सिंग यादव (खासदार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

२. अली अनवर अन्सारी (माजी खासदार, जनता दल (यू))

३. पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री आणि आमदार, महाराष्ट्र, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

४. सयदा हमीद (माजी सदस्य, नियोजन आयोग)

५. दीपेन्दर सिंग हूडा (खासदार , हरियाणा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

६. दिग्विजय सिंह (खासदार , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )

७. जिग्नेश मेवाणी (आमदार, गुजरात)

८. वृंदा करात (माजी खासदार, सीपीआय (एम))

९. एम. व्ही. राजीव गौडा (खासदार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )

१०. के.  राजू (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

११. योगेंद्र यादव (स्वराज इंडिया)

१२. अविक साहा (जय किसान आंदोलन)

१३. के.सी. राममूर्ती (खासदार , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )

१४. सीताराम येचुरी (माजी खासदार, सीपीआय (एम))

१५. जयती घोष (प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ)

१६. हर्ष मांदेर (अमन बिरदरी)

१७. अरुणा रॉय (भारतीय महिला फेडरेशन)

१८. शंकर सिंह (नरेगा संघर्ष मोर्चा)

१९. ऍनी राजा (पीपल्स ऍक्शन फॉर एम्प्लॉयमेंट गॅरंटी)

२०. निखिल डे (मजदूर किसान शक्ती संगठन)

२१. प्रभात पटनायक (जेएनयू येथील सन्माननीय निवृत्त प्राध्यापक)

२२. अमी यज्ञिक (लोकसभा खासदार, आयएनसी)

२३. प्रदीप तामता (राज्यसभा खासदार)

२४. गौरव गोगोई (लोकसभा खासदार, आयएनसी)

२५. रोनाल्ड सापा तलाऊ (राज्यसभा खासदार, आयएनसी)

२६. सीएल रुआला (लोकसभा खासदार आयएनसी)

२७. रिपुण बोरा (राज्यसभा खासदार, आयएनसी)

२८. हुसेन दलवाई (राज्यसभा खासदार, आयएनसी)

२९. पी. भट्टाचार्य (राज्यसभा खासदार, आयएनसी)

३०. डी. राजा (राज्यसभा खासदार   सीपीआय)

३१. विप्लोव ठाकूर (राज्यसभा खासदार ,  आयएनसी)

३२. प्रताप सिंह बाजवा (राज्यसभा खासदार, आयएनसी)

३३. मोहम्मद अली खान (राज्यसभा खासदार, आयएनसी)

३४. बीके हरिप्रसाद (राज्यसभा खासदार, आयएनसी)

३५. छाया वर्मा (राज्यसभा खासदार, आयएनसी)

३६. नीरज शेखर (राज्यसभा खासदार, समाजवादी पार्टी)

३७. सुरेंद्र सिंह नगर (राज्यसभा खासदार, समाजवादी पार्टी)

३८. संजय सेठ (राज्यसभा खासदार, समाजवादी पार्टी)

३९. व्ही. पी. निषाद (राज्यसभा खासदार, समाजवादी पार्टी)

४०. व्ही प्रभाकर रेड्डी (राज्यसभा खासदार, वायएसआर काँग्रेस)

४१. परिमल नाथवानी (राज्यसभा खासदार, आयएनडी)

४२. बी.वी. नाईक (लोकसभा खासदार, आयएनसी)

४३. आर. ध्रुवनारायण (लोकसभा खासदार, आयएनसी)

४४. जयदेव गल्ला (लोकसभा खासदार, टीडीपी)

४५. डॉ. एन शिवप्रसाद (लोकसभा खासदार, टीडीपी)

४६. ​​निम्मला क्रिस्तप्पा (लोकसभा खासदार, टीडीपी)

४७. राम मोहन नायडू (लोकसभा खासदार, टीडीपी)

४८. अशोक गजपती राजू (लोकसभा खासदार, टीडीपी)

४९. श्रीराम मल्याद्री (लोकसभा खासदार, टीडीपी)

५०. टी.जी. वेंकटेश (राज्यसभा खासदार, टीडीपी)

५१. एम. बी. राजेश (लोकसभा खासदार, सीपीआय (एम))

५२. व्ही. एच. पाला (लोकसभा खासदार, आयएनसी)

५३. जितेंद्र चौधरी (लोकसभा खासदार, सीपीआय (एम))

५४. बिनोय विश्वम (राज्यसभा खासदार, सीपीआय)

५५. डी. संतनु सेन (राज्यसभा खासदार, एआयटीसी)

५६. कुमारी सेल्जा (राज्यसभा खासदार, आयएनसी)

५७. वंदना चव्हाण (राज्यसभा खासदार, एनसीपी)

५८. वाईएस चौधरी (राज्यसभा खासदार, टीडीपी)

५९. के रवींद्र कुमार (राज्यसभा खासदार, टीडीपी)

६०. पी व्ही अब्दुल वहाब (राज्यसभा खासदार, आययूएमएल)

६१. कलिता भुबनेश्वर (राज्यसभा खासदार, आयएनसी)

६२. डॉ. प्रकाश बांदा (राज्यसभा खासदार, टीआरएस)

६३. सी.एम. रमेश (राज्यसभा खासदार, टीडीपी)

६४. लिंगय्या यादव (राज्यसभा खासदार, टीआरएस)

६५. संतोष कुमार जोगिनिपल्ली (राज्यसभा खासदार, टीआरएस)

६६. जया बच्चन (राज्यसभा खासदार, एसपी)

६७. संजय सिंह (राज्यसभा खासदार, आप)

६८. के ​​टी एस तुलसी (राज्यसभा खासदार, नॉम.)

६९. राजीव एस. सातव (लोकसभा खासदार, आयएनसी)

७०. जोसे के मणि (राज्यसभा खासदार, केसी (एम))

७१. के.के. रागेश (राज्यसभा खासदार, सीपीआय (एम))

७२. मनोज कुमार झा (राज्यसभा खासदार, राजद)

७३. के. सोमप्रसाद (राज्यसभा खासदार, सीपीआय (एम))

७४. नारायण दास गुप्ता (राज्यसभा खासदार, आप)

७५. जी.सी. चंद्रशेखर (राज्यसभा खासदार, आयएनसी)

७६. तिरुची शिव (राज्यसभा खासदार, डीएमके)

७७. वानसुक सिएम (राज्यसभा खासदार, आयएनसी)

७८. पी. एल. पुनिया (राज्यसभा खासदार, आयएनसी)

७९. के. व्ही. पी. रामचंद्र (राज्यसभा खासदार, आयएनसी)

८०. अहमद हसन (राज्यसभा खासदार, एआयटीसी)

८१. मधुसूदन मिस्त्री (राज्यसभा खासदार, आयएनसी)

८२. संतियुज कुजूर (राज्यसभा खासदार, आयएनसी)

८३. नारनभाई जे राठवा (राज्यसभा खासदार, आयएनसी)

८४. कुमार केतकर (राज्यसभा खासदार, आयएनसी)

८५. कोनाकल्ला नारायण राव (लोकसभा खासदार, टीडीपी)

८६. संतोक सिंह चौधरी (लोकसभा खासदार, आयएनसी)

८७. गुरजीत सिंह औजला (लोकसभा खासदार, आयएनसी)

८८. आर. राधाकृष्णन (लोकसभा खासदार, एआयएनआरसी)

८९. एमएस स्वामीनाथन (एम. एस. एस. आर. एफ. चे शास्त्रज्ञ आणि संस्थापक)

९०. मरीया ई. जॉन (महिला विकास अभ्यास केंद्र)

९१. डॉ. व्ही. मोहिनी गिरी (अध्यक्ष, द गिल्ड फॉर सर्व्हिस)

९२. सुश्री मीरा खन्ना (कार्यकारी उपाध्यक्ष, द गिल्ड फॉर सर्व्हिस)

९३. इलिना सेन

९४. रवि बुद्धिराजा (निवृत्त आयएएस अधिकारी)

९५. शांता सिन्हा (माजी अध्यक्ष – बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग अधिकार)

९६. युग मोहित चौधरी (विचारवंत आणि मानवाधिकार वकील)

९७. धीरेंद्र सिंह (निवृत्त आयएएस अधिकारी)

९८ चित्रांगदा चौधरी (स्वतंत्र पत्रकार आणि संशोधक)

९९. दीप जोशी (संस्थापक, प्रदान)

१००. मल्लिका साराभाई (कलाकार)

१०१. ओसामा मंजार (डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन)

१०२. स्मिता गुप्ता (स्वतंत्र अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधक)

१०३. तीस्ता सेटलवाड (सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस)

१०४. बेला भाटिया (स्वतंत्र संशोधक)

१०५. हिमांशु ठक्कर (एसएएनडीआरपी, दिल्ली)

१०६. पोगुरी चेन्नाया (नॅशनल ऍग्रिकल्चरल वर्कर्स फोरम, नॅशनल सेंटर फॉर लेबर)

१०७. प्रीती संपत (आंबेडकर विद्यापीठ)

१०८. सी. पी. चंद्रशेखर (जेएनयू)

१०९. अरिंदम बॅनर्जी (आंबेडकर विद्यापीठ)

११०. झोया हसन (माजी प्रोफेसर, जेएनयू)

१११. सुमी कृष्णा

११२. एस. सुब्रमण्यन (माजी आयसीएसएसआर नॅशनल फेलो)

११३. मधु भादुरी (भारताचे निवृत्त राजदूत)

११४. कमल मित्रा चेनोय (प्राध्यापक, जेएनयू)

११५. अनुराधा चेनोय (प्राध्यापक, जेएनयू)

११६. रश्मी शुक्ला शर्मा (आयएएस निवृत्त)

११७. मेजर जनरल एसजी व्होम्बटकरे (एनएपीएम कर्नाटक)

११८. टी. एम. कृष्णा (संगीतकार आणि कार्यकर्ते)

११९. एलडी मिश्रा (आयएएस निवृत्त)

१२०. नूर मोहम्मद

१२१. अचिन वनिक (निवृत्त प्राध्यापक, दिल्ली विद्यापीठ)

१२२. राजेंद्र रवि (एनएपीएम)

१२३. आनंद पटवर्धन (डॉक्युमेंटरी फिल्ममेकर)

१२४. तारू दालमिया (संगीतकार, नवी दिल्ली)

१२५. सुबोध लाल

१२६. गौरी शंकर घोष

१२७. ईएएस सर्मा (आयएएस, निवृत्त)

१२८. अरुणा रॉड्रिग्स (सन रे हार्वेस्टर्स)

१२९. शैलेश गांधी (माजी माहिती आयुक्त-सीआयसी)

१३०. अन्नपूर्णा शॉ (प्राध्यापक निवृत्त आयआयएम कलकत्ता)

१३१. आशिम जैन

१३२. दिलीप डिसूझा (लेखक, मुंबई)

१३३. अदिती मेहता (आयएएस निवृत्त)

१३४. रमणी वेंकटेशन (आयएएस निवृत्त)

१३५. नितीन देसाई

१३६. के अशोक वर्धन शेट्टी (आयएएस, निवृत्त)

१३७. नवरेखा शर्मा

१३८. उमा (एनएपीएम)

१३९. बसंत हेतम सरिया (एनएपीएम झारखंड)

१४०. मीरा संघ मित्रा (एनएपीएम)

१४१. सुनंदा सेन (बार्ड कॉलेज)

१४२. उमा चक्रवर्ती (इतिहासकार)

१४३. जावेद आनंद (पत्रकार आणि नागरिक अधिकार कार्यकर्ते)

१४४. दिनेश मोहन (आयआयटी दिल्ली)

१४५. जेपी राय (आयएएस निवृत्त)

१४६. कविता कृष्णन (एआयपीडब्ल्यूए)

१४७. धिरेन्द्र झा (अखिल भारतीय कृषी आणि ग्रामीण कामगार संघटना)

१४८. देब मुखर्जी (आयएएस)

१४९. देवकी जैन, अर्थशास्त्रज्ञ

१५०. आभा भाईया (महिला अधिकार कार्यकर्ता)

१५१. विभा पुरी दास (आयएएस, निवृत्त)

१५२. केशव देसीराजू (आयएएस, निवृत्त)

१५३. अजीत भट्टाचारजी (दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स)

१५४. अमिता बाविस्कर (इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ)

१५५. शीला भल्ला (सन्माननीय निवृत्त प्राध्यापक, जेएनयू)

१५६. कमल कांत जसवाल (माजी सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार)

१५७. आनंद तेलतुंबडे (वरिष्ठ प्राध्यापक आणि अध्यक्ष बिग डेटा ॲनालिटिक्स, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट)

१५८. कथैनी चर्मराज (कार्यकारी विश्वस्त, सिव्हीआयसी-बॅंगलोर)

१५९. अरुंधती रॉय (लेखक)

१६०. हिमांशु (असोसिएट प्रोफेसर, जेएनयू)

१६१. स्वामी अग्निवेश, कार्यकर्ते

१६२. सी. राममनोहर रेड्डी (संपादक, द इंडिया फोरम, सल्लागार, नागरिक ग्राहक आणि नागरी कार्य समूह)

१६३. ग्लेडस्टोन जेवियर (प्राध्यापक, लोयोला कॉलेज, चेन्नई)

१६४. विपुल मुद्गल (संचालक, कॉमन कॉज इंडिया)

१६५. जगदीश जोशी

१६६. पी. भट्टाचार्य

१६७. ललित माथुर (आयएएस, निवृत्त)

१६८. आलोक पर्ती (आयएएस, निवृत्त)

१६९. सलाहुद्दीन अहमद (आयएएस, निवृत्त)

१७०. अरुण कुमार

१७१. नरेश सक्सेना (आयएएस, निवृत्त)

१७२. सागर रबरी (गुजरात खेडूत एकता मंच)

१७३. आशिष रंजन (जन जागरण शक्ती संघ)

१७४. एस सत्यभामा (आयएएस, निवृत्त)

१७५. थँकसी फ्रान्सिस थेक्केकारा (आयएएस, निवृत्त)

१७६. मृत्युंजॉय मोहंती (प्राध्यापक, आयआयएम कलकत्ता)

१७७. अरुंधती धुरु (एनएपीएम)

१७८. शेखर सिंग

१७९. ईरा पांडे, लेखक

१८०. निवेदिता मेनन (जेएनयू)

१८१. अनुरागिनी नगर

१८२. श्रीनिवास चंद्रम

१८३. मनोहर इलावर्ती (सरचिटणीस, स्वराज अभियान, कर्नाटक)

१८४. व्ही. रुक्मिणी राव (ग्राम्य रीसोर्स सेंटर फॉर वीमेन, तेलंगाना)

१८५. वत्सला अनेकल (चिंतामणी तालुक, कर्नाटक)

१८६. मलिका विरडी (उत्तराखंड महिला मंच)

१८७. जनचेतना संस्थान, राजस्थान

१८८. संतोष गेडाम

१८९. संदीप चौधरी (प्रकल्प अधिकारी – ऍक्सेस टू एनर्जी इन फॉरेस्ट लँडस्केप्स)

१९०.  सुब्रत दास (सीबीजीए)

१९१. वसंत कन्नबीरन (लेखक, महिला अधिकार कार्यकर्ते)

१९२. डॅनियल माजगावकर (कार्यकर्ता, मुंबई)

१९३. गिनी श्रीवास्तव (नॅशनल फोरम फॉर सिंगल वुमन राइट्स)

१९४. वजाहत हबीबुल्ला (आयएएस, निवृत्त)

१९५. सोमनाथ मुखर्जी (कार्यकर्ता, एआयडी)

१९६.  शिराज प्रभू (कार्यकर्ता)

१९७.  पीटी जॉर्ज

१९८. डुनू रॉय (कार्यकर्ता)

१९९. सज्जाद हसन (आयएएस)

२००. मीना गुप्ता (आयएएस, निवृत्त)

२०१. तारा मुरली (आर्किटेक्ट, सल्लागार, नागरिक ग्राहक आणि नागरी कार्य समूह)

२०२. गॅब्रिएल डायट्रिच (एनएपीएम)

२०३. दिशा

२०४. अनंत फडके

२०५. गोपलालन बालागोपाल

२०६. ऍना डानी

२०७. मानब रॉय

२०८. विमल भाई (एनएपीएम)

२०९. सुंदर बुरा (आयएएस, निवृत्त)

२१०. अभिजीत सेनगुप्ता (आयएएस, निवृत्त)

२११. प्रणव मुखोपाध्याय (आयएएस, निवृत्त)

२१२. सी. बालकृष्णन (आयएएस, निवृत्त)

२१३. रवि वीरा (आयएएस, निवृत्त)

२१४. कृष्णकांत चौहान (एनएपीएम)

२१५. उमेश आनंद, संपादक, सिव्हिल सोसायटी ऑनलाइन

२१६. हिमशी सिंह (एनएपीएम)

२१७. नटराजन बालाबास्कर (आयएएस, निवृत्त)

२१८. हर्ष मांदेर (कार्यकर्ता)

२१९. प्रफुल्ल सामंतार (एनएपीएम)

२२०. सोना मित्रा

२२१. दयामणी बार्ला (एनएपीएम)

२२२. आदित्य भट्टाचारजी

२२३. प्रदीप के. डेब (आयएएस निवृत्त)

२२४. शांती काकर (आयएएस निवृत्त)

२२५. राहुल खुल्लर (आयएएस निवृत्त)

२२६. नरेश दयाल (आयएएस निवृत्त)

२२७. देवसाह्यम एमजी (आयएएस निवृत्त)

२२८. गौतम मोदी (एनटीयूआय)

२२९.भास्कर प्रभू (माहिती अधिकार मंच, महाराष्ट्र)

२३०. सुजीत पटवर्धन

२३१. झेवियर डायस (माजी संपादक, खान, कनीज और अधिकार)

२३२. त्रिपुरारी शर्मा (माजी प्राध्यापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)

२३३. चेला राजन (आयआयटी-मद्रास)

२३४. आशिष कोठारी (पर्यावरणवादी, कल्पनावृक्ष)

२३५. प्रवेश शर्मा

२३६. अर्धेंदु सेन (आयएएस, निवृत्त)

२३७. अजय कुमार

२३८. फ्रॅंग रॉय (समन्वयक टीआयपी, अध्यक्ष, एनईएफएसएएस)

२३९. फराह नकवी (लेखक)

२४०. इम्राना कादीर (माजी प्राध्यापक, जेएनयू-सीएसडी, भारत)

२४१. इंदु कुमारी

२४२. आफताब सेठ (राजनीतिज्ञ, ग्रीस, जपान आणि व्हिएतनाम येथील भारताचे माजी राजदूत)

२४३. रेणू खन्ना (एनएपीएम)

२४४. राहुल मुखर्जी (हेडेलबर्ग विद्यापीठ)

२४५. सुमित कुमार (आयएएस)

२४६. प्रोफेसर हरगोपाल, एनएलएस बंगलोर

२४७. कोनिनिका रे (एनएफआयडब्ल्यू)

२४८. पूर्णिमा उपाध्याय (मेळघाट जनाधिकार आंदोलन, महाराष्ट्र)

२४९. रंजन रे (डॉ. ए. व्ही. बालिगा मेमोरियल ट्रस्ट)

२५०. दीपा सिन्हा (आंबेडकर युनिव्हर्सिटी)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0