‘मॉडर्ना’च्या लसीचे परिणाम आशादायक

‘मॉडर्ना’च्या लसीचे परिणाम आशादायक

शिकागोः अमेरिकेतल्या मॉडर्ना या कंपनीकडून कोविड-१९वर सध्या सुरू असलेल्या मानवी चाचण्यांचे निष्कर्ष आशादायक व सुरक्षित असल्याचे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ म

धन्यवाद कोरोना ?
‘लॉकडाऊन हे ‘पॉझ बटन’, चाचण्या अधिक हव्या’
उ. कोरियात ‘कोविड-१९’चा संशयित रुग्ण

शिकागोः अमेरिकेतल्या मॉडर्ना या कंपनीकडून कोविड-१९वर सध्या सुरू असलेल्या मानवी चाचण्यांचे निष्कर्ष आशादायक व सुरक्षित असल्याचे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोविड-१९ची लागण झालेल्या काही रुग्णांना मॉडर्नाने आपल्या विकसित केलेल्या लसीचे दोन डोस दिले. त्यानंतर या रुग्णांमध्ये अँटिबॉडीजची टक्केवारी अपेक्षेनुसार अधिक वाढल्याचे दिसून आले. ही टक्केवारी कोविड-१९मधून बरे झालेल्या रुग्णांमधील अँटिबॉडिजच्या तुलनेत अधिक असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.

या चाचण्यांना सामोरे गेलेल्या रुग्णांमध्ये लसीचे कोणतेही वाईट परिणाम दिसले नाहीत. पण चाचण्यांमध्ये भाग घेतलेल्या एकूण रुग्णांमधील अर्ध्याअधिक रुग्णांना थकवा, डोकेदुखी, थंडी, स्नायूदुखी जाणवली. हे परिणाम लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर आढळून आले. या डोसचे प्रमाण सर्वाधिक होते.

मॉडर्नाने कोरोना विषाणूचा जेनेटिक सिक्वेन्स बाहेर आल्यानंतर ६६ दिवसानंतर, १६ मार्चला मानवी चाचण्या घेण्यास सुरूवात केली होती.

सध्या मॉडर्नाने आपल्या लसीच्या चाचण्या ४५ कोविड-१९ रुग्णांवर घेतल्या असून लस शरीरात सोडल्यानंतर ती पेशींना प्रोटीन बनवण्यास उद्युक्त करते आणि कोरोना विषाणूचा प्रतिरोध करते. पण सध्या हातात आलेल्या निष्कर्षावर शास्त्रज्ञ समाधानी नाहीत. या लसीच्या तिसर्या टप्प्यातल्या ३० हजार कोविड-१९ रुग्णांवरील चाचण्या येत्या दोन आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. यांचे निष्कर्ष समाधानकारक आल्यास कंपनी दरवर्षी सुमारे ५०० कोटी डोसचे उत्पादन करणार असून २०२१पर्यंत हे उद्दिष्ट्य १ अब्ज लसींचे असणार आहे.

मॉडर्नाने गेल्या एप्रिलमध्ये मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू केला होता. या टप्प्यांमध्ये ५५ वर्ष वयावरील १२० कोरोना बाधित रुग्णांवर लसीचे उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्यात मॉडर्नाने मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू केला. आता तिसरा टप्पा २७ जुलैला सुरू होण्याची चिन्हे आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0