मोदी सरकारचा रोजचा जाहिरात खर्च १ कोटी ९५ लाख

मोदी सरकारचा रोजचा जाहिरात खर्च १ कोटी ९५ लाख

नवी दिल्लीः गेल्या वित्तीय वर्षांत मोदी सरकारने आपली कामगिरी दाखवण्यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सार्वजनिक जाहिराती इ.च्या माध्यमातून ७१३

गृहमंत्र्यांच्या धमकीनंतर सब्यसाचीची जाहिरात मागे
ट्रोल झाल्याने तनिष्कची जाहिरात मागे
तीन वर्षांत केंद्र सरकारचा जाहिरातीवर ९११ कोटींचा खर्च

नवी दिल्लीः गेल्या वित्तीय वर्षांत मोदी सरकारने आपली कामगिरी दाखवण्यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सार्वजनिक जाहिराती इ.च्या माध्यमातून ७१३ कोटी २० लाख रु.चा खर्च सर्वसामान्य जनतेच्या खिशातून केल्याचा खुलासा माहिती अधिकारातून झाला आहे.

जतीन देसाई यांनी या संदर्भातील एक माहिती अधिकार अर्ज केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यानुसार केंद्र सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षांत दरदिवशी १ कोटी ९५ लाख रु. इतका पैसा आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यावर खर्च केल्याचे उघड झाले आहे.

या पैशातील २९५ कोटी ५ लाख रु. हे मुद्रित माध्यमे, ३१७ कोटी ५ लाख रु. इलेक्ट्रॉनिक माध्यमे व १०१ कोटी १० लाख रु. देशभर सार्वजनिक फलकांवर खर्च केला आहे. पण सरकारकडून परदेशी माध्यमांमध्ये किती पैसा खर्च केला आहे, याची माहिती मात्र मिळालेली नाही.

गेल्या वर्षी जूनमध्ये अनिल गलगली या सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केलेल्या माहिती अधिकारानुसार केंद्र सरकारने मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व सार्वजनिक जाहिराती यावर ३,७६७.२६५१ कोटी रु. खर्च केल्याचे उघड झाले होते.

त्या अगोदर २०१८मध्ये ही रक्कम ४,३४३.२६ कोटी रु. इतकी होती. हाही अर्ज गलगली यांनी दाखल केला होता. ही रक्कम २०१४मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर २०१८पर्यंत खर्च केलेली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0