मोदी सरकार देशाला घातकः काँग्रेसचा आरोप

मोदी सरकार देशाला घातकः काँग्रेसचा आरोप

नवी दिल्लीः सत्तेत आलेल्या मोदी प्रणित भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने रविवारी मोदी सरकारवर तोंडसुख घेतल

इकडे आड, तिकडे विहिर….
चेंजमेकर ‘ नंदीग्राम’
निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर

नवी दिल्लीः सत्तेत आलेल्या मोदी प्रणित भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने रविवारी मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. हे सरकार देशाला घातक, हानीकारक असून प्रत्येक आघाडीवर या सरकारला अपयश आले असून सरकारने जनतेच्या सर्व इच्छा आकांक्षा धुळीस मिळवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गेल्या ७ वर्षांत मोदी सरकारने १४० कोटी जनतेला वार्यावर सोडले असून देश उध्वस्त झाल्याचा आरोप केला.

काँग्रेसने रविवारी मोदी सरकारच्या ७ चुकांचे एक पत्रक जारी केले. महागाई, बेरोजगारी, गरीब, शेतकरी, अर्थव्यवस्था यांच्या अवनतीवर भाष्य केले आहे.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओवरील कार्यक्रमावरही काँग्रेसने जोरदार टीका केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी चांगली इच्छाशक्ती, धोरणे व निश्चयाची गरज लागते. दर महिन्याला केल्या जाणार्या बाता नाही असा टोला लगावला. दिल्लीतले सरकार हे देशाला हानीकारक असून या सरकारने जनतेचा विश्वासघात केला, लोकांनी ठेवलेल्या विश्वासाचा अनादर केला असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसने या निमित्ताने ४ मिनिटांचा भारत माता की कहानी या शीर्षकाचा एक व्हीडिओ प्रसिद्ध करून मोदी सरकारचे अपयश अधोरेखित केले.

महाराष्ट्रात काँग्रेसकडून काळा दिवस

मोदी सरकारला ७ वर्षे झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने रविवारी काळा दिवस पाळला. राज्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मोदी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागणी केली.

आत्ममंथन कराः शिवसेनेचा भाजपला टोला

रविवारी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला आत्ममंथन करण्याचा सल्ला दिला. भारत हा जवाहरलाल नेहरु ते मनमोहन सिंग यांच्या चांगल्या कामामुळे उभा राहिला. पण सध्याच्या मोदी सरकारचे अपयश पाहता त्यांनी आत्ममंथन करण्याची गरज असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले. कोविड-१९ महासाथीच्या काळात महागाई, बेराजगारी व अस्वस्थता देशात पसरत चालली आहे, त्यासाठी सरकारने भरीव प्रयत्न करण्याची गरज आहे. जनतेने आपल्याला बहुमताने निवडून दिले. पण लोकांच्या मूलभूत गरजाही हे सरकार पुरे करू शकत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: