१ जूनला केरळात मान्सून धडकणार

१ जूनला केरळात मान्सून धडकणार

नवी दिल्लीः येत्या १ जून रोजी नैर्ऋत्य मौसमी वारे केरळच्या किनार्यावर पोहचतील अशी माहिती भारतीय हवामान खात्याने गुरूवारी दिली. दरवर्षी १ जूनला केरळच्या किनार्यावर मोसमी वारे धडकत असतात, यंदाही ते १ जूनला पोहोचतील असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

भारतात जून ते सप्टेंबर या काळात एकूण ७० टक्के मोसमी पाऊस पडतो. गुरुवारी हवामान खात्याने ‘एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट’ (ईआरएफ) प्रकाशित केले, त्या आधारावर १ जूनला केरळात पावसाचे आगमन होईल असे ट्विट अर्थसायन्स खात्याचे सचिव एम. राजीवन यांनी केले आहे.

आता येत्या १५ मे रोजी ‘लाँग रेंज फोरकास्ट’ (एलआरएफ) जाहीर करण्यात येईल. त्यानुसार अंदमान समुद्रात मोसमी वारे कोणत्या तारखेला पोहोचणार आहेत आणि ते भारतात केव्हा पोहोचणार आहेत, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.

यंदा पाऊस चांगल्या स्वरुपाचा असेल असा अंदाज यापूर्वी हवामान खात्याने वर्तवला आहे.

COMMENTS