केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन

केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन

नैर्ऋत्य मोसमी वारे येत्या १ जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचतील अशी माहिती भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिली. अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व व प

माणूस झाला छोटा, निसर्ग झाला मोठा!
पर्यावरण मंत्रालयाच्या नव्या वन संरक्षण नियमांमुळे वनहक्कांवर गदा
उत्तराखंडात हत्तींच्या वनावर विमानतळाचे अतिक्रमण

नैर्ऋत्य मोसमी वारे येत्या १ जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचतील अशी माहिती भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिली. अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व व पूर्वमध्य भागात ३१ मे ते ४ जून दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत असून ही हवामान परिस्थिती १ जूनला केरळच्या किनारपट्टीवर पहिला मान्सून पोहोचवण्यात पोषक स्वरुपाची आहे,  असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

बुधवारपासून मान्सूनने मालदिव-कॉमोरिन भागात मार्गाक्रमण केले आहे, तो बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे जाऊन अंदमान समुद्रावर जाईल तेथून तो अंदमान व निकोबार बेटांकडे जाईल असेही हवामान खात्याने सांगितले.

दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिम-मध्य भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असून तो उत्तर-पश्चिमेकडे ओमान किनारपट्टीकडे येत्या ४८ तासात जाईल असेही हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे भारतीय प. किनारपट्टीवर वादळे येणार नाहीत.

प. बंगाल व ओदिशावर अम्फान वादळ आल्याने गेले १० दिवस मान्सूनची प्रगती रेंगाळली आहे, असेही सांगण्यात आले.

गेल्या महिन्यात हवामान खात्याने केरळमध्ये ५ जून रोजी मान्सून पोहोचेल असे म्हटले होते पण आता या तारखेत दुरुस्ती करण्यात आली आहे.

हवामान खात्याने यंदाचा मान्सूस सरासरी एवढा पडेल असेही भाकीत केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: