मुंबईत १० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

मुंबईत १० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मंगळवारी लक्षणीय वाढल्याचे दिसून आले. एकट्या मुंबई शहर व उपनगरात कोरोनाचे १०,८६० नवे रुग्ण आढळले असू

काबूलमध्ये बॉम्बस्फोट २५ शीख भाविक ठार
कुर्ल्याच्या नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसरा डोसला प्राधान्य

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मंगळवारी लक्षणीय वाढल्याचे दिसून आले. एकट्या मुंबई शहर व उपनगरात कोरोनाचे १०,८६० नवे रुग्ण आढळले असून यातील ८९ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळले नाहीत. पण मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सोमवारच्या तुलनेत ३४ टक्के अधिक असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी ओमायक्रॉन विषाणूचे राज्यात ७५ रुग्ण आढळले असून एकट्या मुंबईत ४० रुग्णांना या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात ९, पुणे महापालिका क्षेत्रात ८, पनवेलमध्ये ५, नागपूर, कोल्हापूरमध्ये प्रत्येकी ३, पिंपरी-चिंचवडमध्ये २ तर भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्र, उल्हास नगर, सातारा, अमरावती, नवी मुंबईत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. राज्यात मंगळवार अखेर ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ६५३ इतकी झाली आहे.

मंगळवारी ८३२ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले. या पैकी ५२ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात मंगळवारी कोरोनाच्या ४९,६६१ चाचण्या झाल्या आहेत.

दरम्यान, मुंबईत कोरोनाची सुनामी लाट आली तरी प्रशासन त्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे मुंबईच्या महापौर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एकट्या मुंबईत ७० टक्क्यापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९२ टक्के इतका असू २८ डिसेंबर २०२१ ते ३ जानेवारी २०२२ अखेर कोविड रुग्णांच्या वाढीचा दर ०.६३ टक्के इतका आहे. तर दुप्पटीचा दर ११० दिवस आहे. सध्या मुंबईत ३८९ इमारतींना सील केल्या आहेत व १८ कंटेनमेंट झोन केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0