बिहार निवडणुकाः १२०० उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद

बिहार निवडणुकाः १२०० उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद

नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये उभे असलेल्या १२०० हून अधिक उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी ११५ महिला आरोपी असून ७३ जणांवर खूनाचे

बिहारच्या विकासासाठी प्रशांत किशोर यांचे व्यासपीठ
बिहारमध्ये जेडीयू-राजदने बहुमत जिंकले, भाजपचा सभात्याग
बिहार: एकाला १०० पैकी १५१ गुण, तर दुसरा शून्य गुण मिळवूनही उत्तीर्ण

नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये उभे असलेल्या १२०० हून अधिक उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी ११५ महिला आरोपी असून ७३ जणांवर खूनाचे आरोप असल्याचा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआऱ)ने जाहीर केला आहे. या अहवालात ३,७२२ उमेदवारांच्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांची माहिती घेण्यात आली असून त्यापैकी १२०१ उमेदवारांवर गुन्हे नोंद आहेत.

२०१५च्या बिहार विधानसभेत ३,४५० उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची माहिती घेतली होती त्यापैकी १,०३८ उमेदवारांवर गुन्हे नोंद होते.

यंदा ३,७२२ उमेदवारांची माहिती घेतली असता त्यातील राष्ट्रीय पक्षांचे ३४९, प्रादेशिक पक्षाचे ४७०, नोंदणीकृत पण पक्षाचा दर्जा नसलेले १६०७ व अपक्ष १२९६ उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत.

राजदच्या १४१ उमेदवारांपैकी ९८, भाजपच्या १०९पैकी ७६, काँग्रेसच्या ७० पैकी ४५, लोजपाच्या १३५ पैकी ७० उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची नोंद आहे.

जेडीयूच्या ११५ उमेदवारांपैकी ५६ व बसपाच्या ७८ पैकी २९ उमेदवारांवर पोलिस दफ्तरी गुन्ह्यांची नोंद आहे.

एकूणात सर्व राजकीय पक्षांमधील ३७ ते ७० टक्के उमेदवारांवर पोलिस गुन्हे आहेत.

निवडणूका व गुन्हेगारी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने या पूर्वी स्पष्ट निर्देश राजकीय पक्षांना दिले आहेत. गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिंना व राजकीय नेत्यांना पक्षांनी तिकिटे देताना काळजी घ्यावी असे न्यायालयाने मत व्यक्त केले होते.

बिहारमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १,०६४ उमेदवारांमधील ३२८ उमेदवारांना गुन्ह्याची नोंद होती. त्यातील २४४ जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद होती.

दुसर्या टप्प्यात १४६३ उमेदवारांपैकी ३८९ उमेदवारांवर गुन्हे नोंद होते. त्यापैकी ३४ टक्क्यांर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

तर तिसर्या टप्प्यात ११९५ उमेदवारांपैकी ३७१ उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील २८२ जणांवर गंभीर गुन्हे आहेत.

बिहारमध्ये दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसरा टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला तर अंतिम निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0