५ कोटी ७ लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस

५ कोटी ७ लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस

कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आलेल

भारतातील कोविडचे वृत्तांकन; ४ छायाचित्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर
राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार
आरोग्य यंत्रणेवर लक्ष हवे; आमदारांचे मत
  • कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आलेली आहे.
  • शून्य रुग्ण – बुधवारी नंदूरबार जिल्ह्यात एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही.
  • १० पेक्षा कमी रुग्ण – राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या ६ जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या १० पेक्षाही कमी आहे.
  • १०० पेक्षा कमी रुग्ण-राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे.
  • सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेले जिल्हे सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग.
  • राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) २.४४ टक्के इतका आहे.
  • राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.

१७ ऑगस्ट २०२१ अखेरची सक्रिय रुग्णसंख्या.

  • आजपर्यंत बाधित झालेले एकूण रुग्ण -६४ लाख १ हजार २१३.
  • बरे झालेले रुग्ण -६२ लाख १ हजार १६८.
  • एकूण मृत्यू – १ लाख ३५ हजार २५५.
  • सक्रीय रुग्ण संख्या – ६१ हजार ३०६.
  • रुग्ण बरे होण्याचा दर– ९६.८७ टक्के.

लसीकरण सद्यस्थिती :

  • राज्यात आजघडीला ५ कोटी ७ लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आलेले आहेत.
  • राज्यातील ४५ वयोगटावरील जवळपास ५० टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २५ टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. राज्यातील १ कोटी ३३ लाख ७ हजार नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या आहेत हा देशातील उच्चांक आहे.
  • तसेच १४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील महाराष्ट्रातील उच्चांक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0