महेंद्र सिंग धोनीः कप्तान ते यशस्वी व्यवस्थापक

महेंद्र सिंग धोनीः कप्तान ते यशस्वी व्यवस्थापक

महेंद्रसिंह धोनीने आपल्या क्रिकेटमधील आव्हानपर यशाद्वारे, भारतीय व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांना जे मार्गदर्शन केले, तेही धोनीच्या क्रिकेटप्रमाणेच संस्मरणीय ठरणार आहे.

भारत-पाक क्रिकेट- उन्माद निर्माण करण्यात काय अर्थ
देर आए.. दुरुस्त आए!
स्वातंत्र्यलढ्यातले क्रिकेटपर्व !

भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या अकल्पित स्वरुपातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सेवानिवृत्ती ही घटना देश-विदेश स्तरावर व विशेषत: क्रिकेट क्षेत्रात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. विशेषत: वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीने व विविध वैशिष्ट्यांसह आणि तपशीलवार पद्धतीने धोनीची सेवानिवृत्ती गाजवली, त्याला तोड नव्हती, असेच म्हणावे लागेल. या सार्‍या प्रसिद्धीच्या पार्श्वभूमीवर ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेटनिवृत्तीच्या निमित्ताने त्याच्या क्रिकेटमधील यशस्वी योगदानावर आधारित जो प्रदीर्घ लेख लिहिला, तोसुद्धा तेवढाच वाचनीय ठरला. मुख्य म्हणजे, धोनीने आपल्या क्रिकेटमधील आव्हानपर यशाद्वारे, भारतीय व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांना जे मार्गदर्शन केले, तेही धोनीच्या क्रिकेटप्रमाणेच संस्मरणीय ठरणार आहे.

नारायण मूर्ती यांनी नमूद केल्यानुसार कुठल्याही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वामुळे तिला प्रतिष्ठा लाभते. अशा यशस्वी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा सर्वत्र आदर केला जातो. या आदरापोटी संबंधित

व्यक्तीला जबाबदारी व अधिकार लाभतात व अशा व्यक्तींचा सर्वजण आदर करतात. व्यवस्थापकीय संदर्भातील यशस्वी ठरण्याच्या या यशोमंत्राची अंमलबजावणी महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटच्या स्टेडियमपासून धावपट्टीपर्यंत मोठ्या जिद्दीने चिकाटीने, दीर्घकाळापर्यंत व यशस्वीपणे केल्याचे प्रामुख्याने दिसून येते.

महेंद्रसिंह धोनीच्या यशस्वी क्रिकेटसह कप्तानकीच्या कारकिर्दीच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे, गोल्फ खेळणार्‍यांपासून तर गावगाडा चालविणार्‍या सर्वांना धोनीच्या क्रिकेटने अक्षरश: वेड लावले. यामध्ये ‘नेट’ लावून क्रिकेटचा सराव करणार्‍यांपासून, चेंडूफळी स्वरुपातील क्रिकेट खेळणार्‍यांचा समावेश झाला, तो उगाच नव्हे. यापैकी अधिकांश जण म्हणूनच तर धोनीच्या फलंदाजीच्या यशस्वी होण्यासाठी देवाचा धावा करीत असत.

वैयक्तिक स्तरावर महेंद्रसिंह धोनीने सार्‍या जगाला दाखवून दिले की, इच्छाशक्ती, प्रयत्न, चिकाटी व सातत्य असले की कुठलीही पूर्वपीठिका नसणारी व प्रसंगी छोट्या शहरातून आलेली व्यक्तीही क्रिकेटसारख्या महानगरीय खेळामध्ये यशस्वीच नव्हे, तर अव्वल ठरू शकते. व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात नव्याने प्रयत्न पदार्पण करणार्‍यांना ही बाब सदैव मार्गदर्शन ठरणारी राहील, यातूनच आत्मविश्वासाचे पाठबळही मिळेल. क्रीडा क्षेत्रातील धोनीच्या नेतृत्वाचा वादग्रस्त व वादातीत दोन्ही ठरण्याचे प्रमाण त्याच्या प्रदीर्घ कालावधीत दिसून येते. व्यवसाय-व्यवस्थापन असो अथवा क्रिकेटचा सामना, संघभावना प्रत्येकाच्या शक्ती-मर्यादांचा शास्त्रीय अभ्यास करून, धोरणात्मक अंमलबजावणी संघनायक आणि व्यवसाय व्यवस्थापकाला करावी लागते. ही अंमलबजावणी कशी परिणामकारक स्वरुपात केली जाईल, यावरच या मंडळींचे यश अवलंबून असते. महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघात खेळाडू, यष्टीरक्षक व कर्णधार म्हणून काम करताना भारतीय क्रिकेटमध्ये केवळ समन्वयच नव्हे, तर संघभावनेची जी रुजवण केली, तिला तोडच नाही.

उद्दिष्टपूर्तीच्या संदर्भात असे सांगितले जाते की, यशासारखे यश नसते व यशाला अनेक दावेदार असतात. मात्र, अपयशाचे कुणी धनी नसते. या वस्तुनिष्ठ परिस्थितीला प्रत्येक व्यवस्थापकाला सामोरे जावे लागते. त्यांचा अनुभव घ्यावा लागतो. ही एक व्यावहारिक अपरिहार्यता आहे. मात्र, या संदर्भात धोनीने केवळ आपले वेगळेपणच सिद्ध केले असे नव्हे, तर प्रसंगी मोठ्या धीराने व हिमतीने सतत प्रयत्न करून त्याला यशाची जोड दिली. अपयशावर मात करून धोनीने त्याच्या प्रदीर्घ क्रिकेट कप्तानीच्या कारकिर्दीत जागतिक टी-२०च्या २४ सप्टेंबर, २०१६च्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध खेळताना आपल्या सहकार्‍यांच्या मानसिकतेत व शैलीमध्ये बदल करून यश खेचून आणले. ती घटना केवळ धोनी आणि भारतीय क्रिकेट संघच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठी रोमहर्षक ठरली. असेच शैली व्यवस्थापन व्यवस्थापकांकडून अपेक्षित असते. क्रिकेट खेळणारे असोत वा काम करणारे, त्यांची मानसिकता बदलली की, यशाचे मैदान नक्कीच मोकळे होते. धोनीचा हा संदेश व्यवस्थापन क्षेत्रासाठीही तेवढाच महत्त्वाचा ठरला आहे.

क्रिकेटचे मैदान असो अथवा कॉर्पोरेट व्यवस्थापन, या दोन्ही ठिकाणी नेतृत्वाने ‘बोले तैसा चाले’ याचा अवलंब करणे अनिवार्य असते. या व्यक्तींच्या जबाबदारीचा हा एक अपरिहार्य भाग ठरतो. त्यांच्या यशाचा पाया ते आपले विचार आणि आचार यांचा समतोल साधून त्यानुसार कशी कर्तबगारी करतात, यावर अवलंबून असतो. अनेक व्यवस्थापकांना प्रकर्षाने जाणवणारी बाब, तर धोनीने आव्हानपर स्थितीनुरूप प्रत्येक वेळी धडाडीने पुढाकार घेऊन सिद्ध केली. त्याने त्याशिवाय आपल्या कृतिशील क्रिकेटला सर्वस्वी प्रयत्नांची साथ दिली.

त्यासाठी धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या परिणामांची फिकीर केली नाही व यातूनच धोनीच्या यशस्वी क्रिकेटचे अनेक आयाम साकारले. धोनीच्या जीवनातील या पैलूंचा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अभ्यास करता येण्यासारखा आहे.

आपल्या सहकार्‍यांना मार्गदर्शन-प्रोत्साहन देणे हे प्रत्येक व्यवस्थापकाचे आद्य कर्तव्य असते. व्यवस्थापक व व्यवस्थापन या उभयतांचे यश यावरच अवलंबून असते. ज्ञानापासून तंत्रज्ञानापर्यंतच्या सर्व बाबी

समप्रमाणात उपलब्ध असल्या तरी जे व्यवस्थापक आपल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करतात, तेच खर्‍या अर्थाने प्रभावी व यशस्वी होतात, ही व्यवस्थापकीय वस्तुस्थिती आहे.

या संदर्भात धोनीच्या क्रिकेट कप्तानीचे विश्लेषण आजही सर्व व्यवस्थापकांना मार्गदर्शक ठरते. २०११ मधील भारत विरुद्ध श्रीलंकामध्ये खेळल्या गेलेल्या रोमहर्षक जागतिक करंडक सामन्यात धोनीने विलक्षण षटकाराद्वारे विजयश्री खेचून आणली. हे करताना त्याने ज्या पद्धतीने ताणतणावाचा सामना केलाच व संपूर्ण संघाला प्रोत्साहित केले, त्याला तोड नव्हती. आपल्या बोलण्यानुसार कृतिशीलतेचा व्यवस्थापकीय आदर्शही यानिमित्ताने त्याने प्रस्थापित केला. याशिवाय भारतीय संघ आणि भारतीयांची ऐन परीक्षेच्या क्षणी अपेक्षापूर्तीही केली.

यासंदर्भात खुद्द सुनील गावसकर यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे, आजही त्यांना क्रिकेट जगतातील सर्वोत्तम व भारतीय क्रिकेट संघासाठीचा सर्वात मोठा व यशस्वी क्षण म्हणजे धोनीचा, २०११ मधील श्रीलंकेच्या विरुद्धच्या सामन्यातील ‘तो’ यशस्वी व निर्णायक षटकार आठवतो. एका दिग्गजाकडून दुसर्‍या दिग्गजाला दिलेली ही दाद चिरस्मरणीय ठरते.

व्यवस्थापन क्षेत्रात व्यवस्थापकांकडून संबंधितांच्या निर्णायक क्षणी काय अपेक्षा असतात व त्यांची पूर्तता करण्यावरच व्यवस्थापकाचे निर्णायक नेतृत्व सिद्ध होते. यशस्वी व प्रभावी व्यवस्थापक आपले यश सर्वांसह वाटून घेतात व त्यात इतरांनाही सहभागी करतात. ही बाब जो व्यवस्थापक सातत्याने व यशस्वीपणे करू शकतो, तोच खर्‍या अर्थाने व व्यापक स्वरुपात यशस्वी होतो.

२०११चा जागतिक करंडक धोनीच्या कप्तानीसह जिंकल्यावर धोनीने सचिन तेंडुलकर व गॅरी क्रिस्टन यांच्याबद्दल जो आदर दाखविला, त्यामुळे धोनीच्या यशाची उंची निश्चितच वाढली. आव्हानपर वातावरणात आपले धैर्य व मानसिक शांती बाळगणे व्यवस्थापकांना लाभदायी ठरते. यावेळी वैतागून वा त्रागा करून चालत नाही. या मुद्द्याचाही धोनीने क्रिकेट धावपट्टीवर नेहमीच प्रस्तुत केला. व्यवस्थापक व व्यवस्थापनांपुढे कृतिशील आदर्श प्रस्तुत केला आहे.

दत्तात्रय आंबुलकर, एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: