नकवींच्या निवृत्तीनंतर भाजपचा एकही मुस्लिम सदस्य संसदेत नाही

नकवींच्या निवृत्तीनंतर भाजपचा एकही मुस्लिम सदस्य संसदेत नाही

नवी दिल्लीः भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राज्यसभेचा कार्यकाल संपत आला आहे. आणि भाजपने जारी केलेल्या राज

रजनीकांत यांचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय
मगरमच्छके आंसू …
‘अच्छे दिन’ जानेवाले है !

नवी दिल्लीः भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राज्यसभेचा कार्यकाल संपत आला आहे. आणि भाजपने जारी केलेल्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीत त्यांचे नावही समाविष्ट करण्यात आलेले नाही व यादीत अन्य मुस्लिम उमेदवाराचेही नाव नाही. याचा अर्थ असा होतो की, केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचा एकही मुस्लिम नेता आता राज्यसभेत पुढील दोन वर्षांत दिसणार नाही.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत राज्यसभेत भाजपचे तीन सदस्य राज्यसभेत होते. यात मुख्तार अब्बास नकवी, भाजपचे प्रवक्ते सैयद जफर इस्लाम व ज्येष्ठ संपादक-पत्रकार एम. जे.  अकबर यांचा समावेश होता. या तिघांना भाजपने राज्यसभेची पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. इस्लाम येत्या ४ जुलैला तर अकबर २९ जूनला निवृत्त होत आहेत.

सध्या भाजपचा लोकसभेत एकही मुस्लिम खासदार नाही. त्यात आता राज्यसभेची भर पडल्याने संसदेत भाजपचा एकही मुस्लिम चेहरा जनतेला दिसणार नाही.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने तिकिट दिलेले ६ मुस्लिम उमेदवार पराभूत झाले होते. तर भाजपप्रणित एनडीएतील लोक जनशक्ती पार्टीचे एक सदस्य महबूब अली खैसर हे बिहारमधील खगरिया मतदारसंघात २०१९च्या लोकसभा निवडणुकांत निवडून आले होते. आता एनडीएचा हा एकच मुस्लिम चेहरा संसदेत शिल्लक राहिला आहे.

नकवींचे काय होणार?

मुख्तार अब्बास नकवी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत व हाच मुस्लिम चेहरा गेले अनेक वर्षे भारतीय राजकारणात भाजपने वापरला होता. द हिंदूने दिलेल्या वृत्तात मुख्तार नकवी यांना उ. प्रदेशातील रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. या जागेचे लोकसभा उमेदवार व समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आझम खान यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त आहे. आझम खान यांनी अन्य जागेवरून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

देशातल्या २८ राज्यांत भाजपचा विस्तार झाला असून येथून १,३७८ लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत. पण केवळ आसाममधून निवडून आलेले नुमल मोमीन हे भाजपचे एकमेव आमदार आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0