शिवकालीन अंगरखा, पैठणी व नाना शंकरशेट टोपी

शिवकालीन अंगरखा, पैठणी व नाना शंकरशेट टोपी

मुंबई : भारतीय संस्कृतीला व परंपरेची ओळख म्हणून यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात एक नवा पायंडा मुंबई विद्यापीठाने सुरू केला आहे. यानुसा

मुंबई वातावरण कृती आराखडा जाहीर
नऊ वर्षे उलटूनही शाहीद आझमी खून खटल्याचा निकाल नाहीच!
संजय गांधी पार्कची वन्यप्राणी दत्तक योजना

मुंबई : भारतीय संस्कृतीला व परंपरेची ओळख म्हणून यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात एक नवा पायंडा मुंबई विद्यापीठाने सुरू केला आहे. यानुसार शौर्याचं प्रतीक म्हणून शिवकालीन अंगरखा, सुंदरता म्हणून पैठणी बॉर्डर आणि विद्वता म्हणून जगन्नाथ (नाना) शंकरशेट टोपी… असा पोशाख दीक्षांत समारंभात दिसणार आहे. या बदलाला व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली आहे.

गेल्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या पोशाखात बदल करण्याची बाब विचाराधीन होती, त्याअनुषंगाने हा बदल करताना भारतीय परंपरा, संस्कृती, पोशाख, रंगसंगती, फॅब्रिक्स, मटेरिअल अशा विविध बाबींवर सखोल अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाने प्रा. एम.डी. तेली, प्रा. अरमैती शुक्ला आणि श्रीमती अर्चना राव यांची समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशीने विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा पोशाख ठरविण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

विशेष बाब म्हणजे पोशाखासाठी खादीचा वापर करण्यात येणार असून खादी ग्रामोद्योग येथून फॅब्रिक्स मागविण्यात येणार आहे. तज्ज्ञ शिंप्यांकडून विविध रंगांचे पोशाख शिवण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी आणि पीएचडीप्राप्त विद्यार्थ्यांना विद्याशाखानिहाय विविध रंगाचे सॅच देण्यात येतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: