नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुक

बंगालची निवडणूक आणि भारताचे राजकीय भवितव्य
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको; ठराव संमत
‘आर्टिकल १५’, जातभान आणि निवडणुकीचे राजकारण

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली.

राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै २०२२ रोजी या निवडणुकांची घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात १२ जुलै २०२२ रोजी सुनावणी झाली. समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासवर्गाबाबत दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला; तसेच १९ जुलै २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0