नागनदी प्रकल्पः केंद्रीय कॅबिनेट वित्त समितीची मंजुरी

नागनदी प्रकल्पः केंद्रीय कॅबिनेट वित्त समितीची मंजुरी

नवी दिल्ली: नागपूर येथील नाग नदीच्या पुनर्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर बुधवारी कॅबिनेटच्या खर्च व वित्त समितीने (ईएफसी) मंजुरी दिली

भारतात मुलांचे ६९% मृत्यू कुपोषणामुळे : युनिसेफ
किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर सर्वथरातून संताप
कोरोनाच्या लाटेत दिल्ली बेहाल का?

नवी दिल्ली: नागपूर येथील नाग नदीच्या पुनर्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर बुधवारी कॅबिनेटच्या खर्च व वित्त समितीने (ईएफसी) मंजुरी दिली आहे, याद्वारे प्रकल्पाच्या २ हजार ११७ कोटी रु.च्या कामांना सुरूवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाग नदी पुनर्जीवन प्रकल्पाच्या पूर्णत्वास आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून या अंतर्गत ९२ एमएलडी  क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, ५०० कि.मी. सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन कम्युनिटी टॅायलेट निर्माण केले जाणार आहेत.

नागपूर शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या नाग नदीला पुनर्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना मंजूर केली आहे. नाग नदीच्या प्रवाह क्षेत्रातील भूजल पातळी वाढवण्यात आल्यास नदी पुनर्जीवित होईल, असा निष्कर्ष नागपुरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या संशोधनात काढण्यात आला होता.

नाग नदी आधी शुद्ध पाण्याने प्रवाहित होती. झपाट्याने झालेल्या शहरीकरणाचे परिणाम नदीच्या मूळ प्रवाहावर झाला आहे. नागपूर महापालिकेने केंद्र सरकारकडे नागनदी पुनर्जीवित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे केंद्र शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली होती. केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीने दिलेल्या मंजुरीनंतर आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्षाला सुरूवात होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0