नागालँड पोलिसांचे लष्कराच्या ३० जवानांवर आरोपपत्र

नागालँड पोलिसांचे लष्कराच्या ३० जवानांवर आरोपपत्र

दिमापूर: ४ डिसेंबर २०२१ रोजी मोन जिल्ह्यातील ओटिंग-तिरू भागात लष्कराच्या कारवाईदरम्यान १४ नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यासह '२१ पॅ

सरन्यायाधीशही आता माहितीच्या अधिकार कक्षेत
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोप निश्चित
‘लोकांना भडकवलं, देशाची माफी मागा’; नुपूर शर्मांना समज

दिमापूर: ४ डिसेंबर २०२१ रोजी मोन जिल्ह्यातील ओटिंग-तिरू भागात लष्कराच्या कारवाईदरम्यान १४ नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यासह ‘२१ पॅरा स्पेशल फोर्स’च्या ३० कर्मचाऱ्यांवर नागालँड पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

आरोपपत्रात सैनिकांच्या पथकावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपपत्रपूर्व तपासात असे आढळून आले की, विशेष दलाच्या ऑपरेशन टीमने कारवाई दरम्यान मानक कार्यप्रणाली (SOP) आणि नियमांचे पालन केले नाही आणि अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे सहा नागरिकांचा तात्काळ मृत्यू झाला आणि इतर दोन गंभीर जखमी झाले.

नागालँडचे पोलीस महासंचालक (डीजीपी) टी. जॉन लाँगकुमार यांनी शनिवारी चुमौकेदिमा पोलीस कॉम्प्लेक्स येथे पत्रकार परिषदे सांगितले, की सैन्याच्या गोळीबारात १४ लोक मारले गेले होते.

५ डिसेंबर रोजी, राज्य गुन्हे पोलीस ठण्याने भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३०२, ३०४, आणि ३४ अंतर्गत लष्कराच्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता आणि तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्यात आला होता.

ते म्हणाले की, एसआयटीने या प्रकरणात कसून तपास केला.  ज्यात विविध प्राधिकरणे आणि स्त्रोतांकडून मिळालेली संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, वैज्ञानिक मत आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) गुवाहाटी, हैदराबाद यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांचा समावेश आहे. तपासादरम्यान चंदीगड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडून पुरावे गोळा करण्यात आले.

डीजीपी म्हणाले की तपास पूर्ण झाला आहे आणि ३० मे २०२२ रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.

ते म्हणाले की २१ पॅरा स्पेशल फोर्सच्या ऑपरेशन टीममधील ३० सदस्यांसह एक मेजर, दोन सुभेदार, आठ हवालदार, चार नाईक, सहा लान्स नाईक आणि नऊ पॅराट्रूपर्स यांच्यावर आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: