निवडणूक आयोगाच्या विरोधात ममता न्यायालयात जाणार

निवडणूक आयोगाच्या विरोधात ममता न्यायालयात जाणार

कोलकाताः नंदिग्राममधील निवडणूक आयोगाच्या अधिकार्याच्या जीवाला धोका होता म्हणून त्यांनी पुन्हा मतमोजणीचा आदेश दिला नाही, असा आरोप प. बंगालच्या नवनिर्वा

यूएपीएतील दुरुस्तीचे दस्तावेज देण्यास गृहखात्याचा नकार
काँग्रेस हरली – बरं झालं!
सरकारी खर्च कमी करण्याच्या काँग्रेसच्या सूचना

कोलकाताः नंदिग्राममधील निवडणूक आयोगाच्या अधिकार्याच्या जीवाला धोका होता म्हणून त्यांनी पुन्हा मतमोजणीचा आदेश दिला नाही, असा आरोप प. बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केला आहे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली होती.  पण त्यांची मागणी फेटाळण्यात आली होती.

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार आहोत असेही सांगितले. बॅनर्जी यांनी नंदिग्राममधील निवडणूक आयोगाच्या अधिकार्याने सीईओ कार्यालयाला पाठवलेला एक एसएमएस पुरावा म्हणून दाखवला. या एसएमएसमध्ये पुन्हा मतमोजणीचे आदेश दिल्यास त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील किंवा आत्महत्या करावी लागेल अशी धमकी या अधिकार्याला दिली होती असे म्हटले होते.

जर निवडणूक आयोग औपचारिक स्वरुपात आपल्या विजयाची घोषणा करते पण नंदिग्रामचा निकाल नेमका उलटा का केला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाचा सर्वर ४ तास बंद का होता, असा सवाल करत बॅनर्जी यांनी आपल्याला सत्य माहीत करून घ्यायचे आहे, ते जसे असेल तसे स्वीकारू असेही स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी यांनी राज्यात उफाळलेल्या हिंसाचारावरही मत व्यक्त करताना आपल्या कार्यकर्त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याने चिथावणी दिल्यास त्याला उत्तर देऊ नये असेही त्या म्हणाल्या.

निवडणुकांच्या काळात केंद्रीय निमलष्करी दलाने तृणमूलच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण केली, त्यांच्यावर अत्याचार केले. आता निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आमच्या समर्थकांवर, कार्यकर्त्यांवर हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक पोलिस अधिकारी भेदभाव करत असल्याचेही त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगाने सहकार्य केले नसते तर राज्यात ५० जागाही भाजपच्या आल्या नसत्या असा दावा त्यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: