मोदी खोटे बोलू शकतात आणि आम्ही हसलो तर गुन्हा?

मोदी खोटे बोलू शकतात आणि आम्ही हसलो तर गुन्हा?

‘हसून असहकाराचे’ आवाहन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात यावी या मागणीबाबत अरुंधती रॉय यांचे उत्तर.

भारतासाठी लज्जास्पद दिवस
ही सामान्य हेरगिरी नाही
भारताची स्थिती मागे उडणाऱ्या विमानासारखी – अरुंधती रॉय

२५ डिसेंबर २०१९ ला दिल्ली विद्यापीठात मी नॅशन पॉप्युलेशन रजिस्टरबद्दल (जो अधिकृतपणे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्ससाठीचाच डेटा आहे हेआता देशाला माहित झाले आहे) बोलताना जे म्हणाले त्याच्या संदर्भात आहे.

मी म्हणाले, २२ डिसेंबरला दिल्ली येथील रामलीला मैदानावरील त्यांच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीआणि डिटेन्शन केंद्रे या दोन्ही गोष्टी अस्तित्वातच नाही असे आपल्याला चक्क खोटे सांगितले.

मी म्हणाले, या खोट्याला प्रतिसाद म्हणून आपण सर्वांनी ते जेव्हा एनपीआरकरिता वैयक्तिक डेटा भरून घ्यायला येतील तेव्हा सामूहिकरित्या चित्रविचित्र खोटी माहिती भरली पाहिजे. मी हसून असहकार करण्याचा प्रस्ताव मांडत होते.

त्यावेळी हजर असलेल्या सर्व मुख्य प्रवाहातील टीव्ही चॅनेल्सकडे माझ्या संपूर्ण भाषणाचे फूटेज आहे. अर्थातच त्यापैकी काहीच त्यांनी दाखवले नाही. नुसतेच त्यावर टिप्पणी करून, ते चुकीचे सादर करून आणि त्याबाबत खोटे बोलून ते स्वतःही उत्तेजित झाले आणि त्यांनी इतरांनाही उत्तेजित केले. त्यातूनच मग माझ्या अटकेची मागणी होऊ लागली आहे आणि टीव्ही क्रू माझ्या घराभोवती वेढा घालून आहे.

सुदैवाने माझे भाषण YouTube वर आहे.

माझा प्रश्न असा आहे: या देशाच्या पंतप्रधानांनी खोटे बोलणे चालते, पण आम्ही हसलो तर तो गुन्हा होतो, सुरक्षेला धोका असतो?

अद्भुत काळ आहे हा. आणि प्रसारमाध्यमेही अद्भुतच!

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0