युक्रेनमधून भारतीयांना आणणे हे ताकद वाढल्याचे लक्षण – मोदी

युक्रेनमधून भारतीयांना आणणे हे ताकद वाढल्याचे लक्षण – मोदी

युक्रेनच्या खार्किव्ह शहरात रशियन हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक सभेत युक्रेनच्या संकटावर स्वतःच्या सरकारची पाठ थोपटून घेतली.

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटांचे खेळ : एक प्रचारकी खेळी
गृहराज्यमंत्री प्रामाणिक बांगलादेशी असल्याचा आरोप
मगरमच्छके आंसू …

सोनभद्र/लखनौ: रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे खार्किव्ह शहरात एका भारतीय विद्यार्थ्याचा जीव गेल्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी निवडणूक सभेत युक्रेनच्या मुद्द्याचा उल्लेख करून आपल्या सरकारचे कौतुक केले.

ते म्हणाले, “जगातील परिस्थिती आज तुम्ही पाहत आहात. युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही एवढी मोठी मोहीम राबवत आहोत ही भारताची वाढती क्षमता आहे.”

ते म्हणाले, “ऑपरेशन गंगा अंतर्गत अनेक हजार नागरिकांना तेथून भारतात परत आणण्यात आले आहे. या मोहिमेला चालना देण्यासाठी आमच्या सरकारने आपले चार मंत्रीही तिथे पाठवले आहेत. संकटात सापडलेल्या भारतीयांना लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपले लष्कर, हवाई दलही तैनात करण्यात आले आहे.”

मोदी म्हणाले, “आज मी देशातील जनतेला आश्वासन देतो की भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी कोणतीही कसर सोडणार नाही. बदलत्या काळात भारताला अधिक शक्तिशाली बनावे लागेल. इतर देशांवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल तेव्हाच भारत शक्तिशाली होईल.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0